Wednesday, November 25, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ५७३ शेतकऱ्यांना दुष्काळी मदत...

Nashik News : जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ५७३ शेतकऱ्यांना दुष्काळी मदत अग्रीम; प्रत्येकी ५ हजार रुपये वितरित

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची कार्यवाही सुरू

नाशिक | Nashik

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या दुष्काळी मदत अग्रीमअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एकूण २२४ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करावे तसेच फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दुष्काळी मदत अग्रीम देण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या मदतीचे वितरण गतीने आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मदत मिळण्यासाठी आधार लिंक व फार्मर आयडी आवश्यक

दुष्काळी मदत अग्रीमचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करावी. तसेच फार्मर आयडी तयार करून घ्यावा. आधार लिंक नसणे, बँक खात्याशी संबंधित त्रुटी किंवा फार्मर आयडी उपलब्ध नसणे यामुळे मदत वितरणात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांना अद्याप दुष्काळी मदत अग्रीम प्राप्त झालेला नाही, त्यांच्यासाठी आवश्यक पडताळणी व प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. कोणताही पात्र शेतकरी तांत्रिक किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग आणि फार्मर आयडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

तालुकानिहाय शेतकरी व मदत वितरणाची आकडेवारी पुढीलप्रमाणे

तालुका, मदत मिळालेले शेतकरी,वितरित मदत (रुपये)

बागलाण ५२,६६७, २६,३३,३५,००० चांदवड ३८,४०८, १९,२०,४०,००० देवळा २२,९५८, ११,४७,९०,००० इगतपुरी १४,४०६, ७,२०,३०,००० कळवण १९,५९३
९,७९,६५,००० मालेगाव ७२,३६३, ३६,१८,१५,००० नांदगाव ३६,२०३, १८,१०,१५,००० निफाड ५६,२९६, २८,१४,८०,००० पेठ ९,५२७, ४,७६,३५,००० सिन्नर
४७,९५५, २३,९७,७५,००० सुरगाणा १४,५७७, ७,२८,८५,००० त्र्यंबकेश्वर १२,९८१,६,४९,०५,००० येवला ५१,६३९, २५,८१,९५,००० एकूण ४,४९,५७३, २,२४,७८,६५,०००

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गर्दीमुळे मुंबईत फसले, परतीच्या वाटेवर नाशिक लुटले!...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दिवाळीचा (Diwali) सण, बाजारपेठेतील झगमगाट आणि रिकाम्या हाती गावी परतायचे नाही, या हट्टापायी उत्तर प्रदेशातील पाच जणांच्या टोळीने नाशिक गाठत...