Wednesday, November 25, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गर्दीमुळे मुंबईत फसले, परतीच्या वाटेवर नाशिक लुटले! आर्या...

Nashik Crime News : गर्दीमुळे मुंबईत फसले, परतीच्या वाटेवर नाशिक लुटले! आर्या ज्वेलर्समधील दागिन्यांचे ट्रे पळवणारे पसार, पाळत ठेवणारे गजाआड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवाळीचा (Diwali) सण, बाजारपेठेतील झगमगाट आणि रिकाम्या हाती गावी परतायचे नाही, या हट्टापायी उत्तर प्रदेशातील पाच जणांच्या टोळीने नाशिक गाठत आर्या ज्वेलर्समधील दागिन्यांची लूट केल्याची बाब तपासात समोर आली आहे. मात्र, या लुटमारीत प्रत्यक्ष दुकानात शिरुन दागिन्यांचा ट्रे पळवणारे मुख्य संशयित अद्याप पसार असून, गुन्हे शाखेच्या पथकाने अटक (Arrested) केलेले दोघे संशयित घटनेच्या वेळी बाहेर ‘पाळत’ ठेवून होते. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथून दोघांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून ५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या (Police) तपासानुसार, पाच जणांच्या या परप्रांतीय टोळीने ह्युंदाई ऑरा कारमधूनप्रवास करत प्रथम मुंबई आणि भिवंडी गाठली. तेथे त्यांनी लुटमारीसाठी रेकी केली; मात्र दिवाळीच्या काळात या दोन्ही शहरांत प्रचंड गर्दी असल्याने त्यांना हालचाल करता आली नाही. मूळ उत्तर प्रदेशकडे परतीच्या प्रवासादरम्यान त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) प्रवेश केला. एवढा खटाटोप करूनही रिकाम्या हाती कसे परतायचे, या विचारातून त्यांनी नाशिकमध्ये काहीशी रेकी केली. येथे दिवाळीचा झगमगाट आणि दुकानांची आकर्षक विद्युत रोषणाई पाहून त्यांनी आडगाव परिसरातील आर्या ज्वेलर्स हे लक्ष्य निश्चित केले. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी टोळीतील तिघांनी रेकी पूर्ण केल्यानंतर काही क्षणांतच ते ग्राहकाच्या वेशात आर्या ज्वेलर्समध्ये शिरले.

सोन्याची साखळी/अंगठ्या पाहण्याचा बहाणा करून त्यांनी थेट दागिन्यांचा ट्रे लांबवला आणि पळ काढला. या घटनेवेळी इतर दोघे संशयित दुकानाबाहेर पाळत ठेवून होते. लूटमारीनंतर पाचही जण कारमधून पसार झाले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई ऑरा कार आणि ३ मोबाइल फोन असा एकूण ५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना नाशिकमध्ये आणून तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत मोहिते, उपनिरीक्षक संजय सानप आदींनी ही कारवाई केली.

​प्रयागराजमध्ये ७ दिवसांचा  शोध

तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने संशयितांचा माग काढला. ते प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती मिळताच पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. सलग सात दिवस परिश्रम घेत पथकाने संशयितांची ओळख पटवली आणि दोघांना ताब्यात घेतले. यात अंतीम कामताप्रसाद तिवारी (वय ३०, रा. जग्गीपूर नडाल, ता. मछलीशहर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश, राहुल राजेंद्रप्रसाद सिंग (वय ३४, रा. गारीयाव, ता. मछलीशहर, जि. जौनपूर यांना अटक केली आहे.

​मुख्य सूत्रधार आणि ३० ग्रॅम सोने अद्याप फरार

अटक झालेले दोघे हे केवळ खासगी चालक आणि गॅरेज मॅकेनिक आहेत. ज्यांनी थेट दुकानात घुसून दागिन्यांचा ट्रे पळवला, ते मुख्य संशयित अद्याप पसार आहेत. तसेच ट्रेमधील अंदाजे ३० ग्रॅम सोने अद्याप जप्त करणे बाकी असून, पसार असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ

३३ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य…मंत्रिमंडळ बैठकीत १४...

0
मुंबई | Mumbaiराज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे १४ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील ३३...