Tuesday, March 31, 2026
Homeक्राईमCrime News : सरकारी सल्लागाराची गुंडगिरी; माफियांच्या बचावासाठी थेट ज्येष्ठास एनकाउंटरची धमकी

Crime News : सरकारी सल्लागाराची गुंडगिरी; माफियांच्या बचावासाठी थेट ज्येष्ठास एनकाउंटरची धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आमच्या आडवा येणाऱ्याला ठोकून काढू, कोणीही वाचवायला येणार नाही, अशा भाषेत नाशिक पोलीस आयुक्तालयाचा नागपूर येथील कथित कायदेशिर सल्लागार अॅड. महेशकुमार गोयल याने एका ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आणि व्हिसलब्लोअरला जीवे (Kill) मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक डायोसेशन ट्रस्टच्या मालमत्ता हडपणाऱ्या संशयिताच्या बाजूने उभे राहून, चक्क पोलिसांच्याच नावाचा वापर करत ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

डॉ. अरविंद गंगाधर मोरे (वय ६९) यांनी नाशिक डायोसेशन ट्रस्टच्या (एनडीटीए) १२ मालमत्तांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी संशयित अजय श्रीवास्तव याच्या विरोधात कायदेशीर लढा पुकारला आहे. या प्रकरणात (दि.१७) रोजी ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष राठोड यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने श्रीवास्तव याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याचाच राग मनात धरून, १९ मार्च रोजी सकाळी अॅड. महेशकुमार गोयल याने डॉ. मोरे यांना फोन (Phone) करून अर्वाच्य भाषेत धमकावले, असे तक्रारीत नमूद आहे.

राज्यातील अनेक वरिष्ठ मंत्री, लोकप्रतिनिधी यांचे नाव सांगून अनेक काळेबेरे केल्याचे आरोप असलेल्या गोयल याने धमकीच्या संभाषणात वारंवार नाशिक पोलीस आयुक्त (Nashik Commissioner of Police) यांचा उल्लेख केला. हा विषय माझ्या आणि सीपीच्या विरोधात गेला आहे, असे भासवून डॉ. मोरे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, शरणपूर रोड येथील पोलीस आयुक्तालयाच्या जागेच्या संदर्भात डॉ. मोरे यांनी स्वतःहून शासनाला संमती दिलेली असतानाही, गोयल यांनी तुम्ही पोलीस आयुक्तालयाच्या कामात अडथळा आणत आहात, असा बनाव रचून लक्ष्य केले.

पोलीस दलातील (Police Force) उच्च पदस्थांचे नाव वापरून एका ज्येष्ठ नागरिकाला ‘नागपूरी टोन’ मधून ठोकून काढण्याची भाषा करणाऱ्या या सल्लागारावर नाशिक पोलीस (Nashik Police) काय कारवाई करतात, याकडे शहराचे लक्ष आहे. दरम्यान, गोयल याला संरक्षणही देण्यात आल्याचे कळते.

धमकीतील विधाने

डॉ. मोरे यांनी सरकारवाडा पोलिसांनी याबाबत पेन ड्राईव्ह, कॉल रेकॉर्डिंग हे पुरावे सादर केले आहेत. त्यात आतमध्ये ठोकल्याशिवाय मी सोडणार नाही, ज्याच्याही सांगण्यावरून तुम्ही हे केले, तुम्हाला इतका त्रास होईल की समजणारही नाही. कोणीही वाचवायला येणार नाही, कितीही मोठा नेता येऊ द्या, त्यालाही आडवा करून टाकू, अशी धमकी दिल्याचे या गंभीर तक्रार अर्जात नमूद आहे.

कायद्याचा रक्षक की भूमाफियांचा हस्तक?

अॅड. गोयल हे पोलीस विभागाचे सल्लागार असल्याचे कळते. ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजय श्रीवास्तवच्या बाजूने का बोलत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डॉ. मोरे यांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम ३५१ (३) आणि ३१९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, अॅड. गोयल यांचे वर्तन वकील पेशाला काळीमा फासणारे असल्याने, बार कौन्सिलने त्यांची सनद रद्द करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

0
सिन्नर | विलास पाटील | Sinnar व्यवसायात बरकत करून देतो म्हणून अनेक भक्तांना वेगवेगळे मार्ग दाखवून गंडवणाऱ्या कॅप्टन अशोककुमार खरात (Ashok Kharat) याच्यामुळे मालामाल झाल्याचे...