Monday, May 25, 2026
Homeमुख्य बातम्याCM Devendra Fadnavis: पेच प्रसंगात राहुल गांधींनी भीती निर्माण केली, पण मोदींनी...

CM Devendra Fadnavis: पेच प्रसंगात राहुल गांधींनी भीती निर्माण केली, पण मोदींनी देशाला…; मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
युद्धामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन लावले आहे. कोणी आठवड्यातून तीन दिवस काम, चार दिवस काम धोरण लागू केले आहे. भारत असा एकमेव देश आहे, जिथे जनजीवन विस्कळीत झाले नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशाला संकटातून बाहेर काढले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआसामला गेलेले आहेत. पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं
देशात इंधन टंचाई किंवा गॅस पुरवठ्याबाबत काळजीची कोणतीही परिस्थिती नाही. उलट आपल्या आजूबाजूचे देश, आशियाई देश, युरोपातील देश यांची परिस्थिती पाहिली, तर ती बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस पण पेट्रोल डिझेलची कमतरता भासू दिली नाही. डोमेस्टिक गॅसची पण कमतरता भासू दिली नाही. कमर्शियल गॅस 70% पर्यंत रिस्टोर आहे. करण्याचा काम पंतप्रधान यांनी केले आहे. संकटाच्यावेळी काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

Nalanda Stampede: बिहारच्या नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण जखमी

पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. परंतु, इंधन साठा पुरेसा असताना, लोकांना रांगेत उभे केले. पेच प्रसंगात जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केले. हे अत्यंत चुकीचे होते, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

ए फॉर आसाम हा नारा मोदींनी दिला
आसाममधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ए फॉर आसाम हा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. केवळ यापुरते मर्यादित न राहता, ते सत्यात आणून दाखवले. त्यामुळे आसाममधील जनता पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मोदी यांचे नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री यांनी कार्य केले आहे पॉझिटिव्ह व्हेव दिसत आहे. काँग्रेसच्या घोषणा पत्राचा काही एक असर होणार नाही.

यापूर्वी महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा कुठेच असर झाला नाही. लोकांना माहीत आहे हे निवडून येणार नाही. लोकांना विश्वास दिला, तर तुम्हाला मोठा जनादेश मिळू शकतो. परंतु, काँग्रेसने लोकांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस आता लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच काँग्रेसला मते मिळत नाहीत. मी आसाममध्ये जे काही पाहात आहे, त्यानुसार भाजपा आणि मित्र पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar Police : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार...

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता म्हणून घेतल्या जाणाऱ्या 'मॉक ड्रिल' दरम्यान अहिल्यानगरमध्ये एक मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयात प्रात्यक्षिके...