Tuesday, November 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News : भ्रष्टाचारात नाशिकचा दुसऱ्यावर्षीही डंका; लाचखोरीत अव्वल, मुंबई-पुण्याला टाकले...

Nashik Crime News : भ्रष्टाचारात नाशिकचा दुसऱ्यावर्षीही डंका; लाचखोरीत अव्वल, मुंबई-पुण्याला टाकले मागे

तर अपसंपदा-तपासात पिंजरा मोकळाच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राजधानी मुंबई आणि आयटी हब पुण्याला (Pune) मागे टाकत नाशिक परिक्षेत्राने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) लाचखोरीत (Bribe Case) अव्वल (प्रथम) स्थान पटकावले आहे. २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नाशिक विभागात तब्बल १२१ सापळा प्रकरणांची नोंद झाली असून त्यात १९६ लाचखोरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ​परंतु, या कारवाईच्या (Action) सपाट्यामागे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लाचखोरांना रंगेहात पकडण्यात आघाडीवर असलेल्या नाशिकचा कन्व्हिक्शन (दाेषसिद्धी) रेट आणि गुन्ह्यांच्या तपासाचा उरक निराशाजनक आहे.

- Advertisement -

​नाशिकमध्ये (Nashik) कारवाईचा धडाका दिसतो, पण न्यायालयात भक्कम पुरावे सादर करून संशयितांना शिक्षा मिळवून देण्यात यंत्रणा तोकडी पडताना दिसत आहे. नाशिक विभागात नोंदवलेल्या १२३ एकूण गुन्ह्यांपैकी तब्बल ९६ प्रकरणे (७८%) अजूनही तपासावर प्रलंबित आहेत. वर्षभरात नाशिकमध्ये अपसंपदेचा अवघा १ गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर खटला भरण्यासाठी प्रशासनाकडून मिळणाऱ्या अभियोग पूर्व मंजुरीचे १० प्रस्ताव अजूनही मंत्रालयात पडून आहेत.

विशेष म्हणजे नागरिकांचा (Citizen) रोजचा संबंध येणारे विभागच भ्रष्टाचाराचे केंद्र बनल्याचे उघड होते. यात महसूल व भूमी अभिलेख विभागातील १४७ प्रकरणांसह आणि तब्बल ४० लाख १५ हजार रुपयांच्या लाचेसह महसूल विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. तर, गृहखात्याच्या नाकाखाली ९७ कारवायांत १४९ पोलीस अधिकारी व कर्मचारी लाच घेताना अडकले आहेत. याशिवाय वीज जोडणी, देयके अन् बांधकामाच्या मंजुरीसाठी महावितरण (४१ प्रकरणे) व महापालिकेत (३० प्रकरणे) लाचखोरीचे जाळे विस्तारले आहे.

नाशिक परिक्षेत्र टॉप, पण तपासात स्लो!

​एकूण सापळा गुन्हे: १२१ (संशयित: १९६) — राज्यात प्रथम!
​एकूण नोंद गुन्हे: १२३
​तपासावर प्रलंबित गुन्हे: ९६
​दोषारोपपत्र दाखल- अवघे १५
​अपसंपदा गुन्हे: ०१

आकडेवारी काय सांगते

पुण्यात १०५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९६ आणि मुंबईत ३२ सापळे रचले गेले. यात नाशिक १२१ सापळ्यांसह अव्वल आहे. पकडण्यात आलेल्या एकूण ८५९ लाचखोरांपैकी ४२९ जण वर्ग-३ (लिपिक, तलाठी, हवालदार) श्रेणीतील आहेत. वर्षभरात राज्यात ३.३१ कोटी रुपयांची लाच जप्त करण्यात आली.

ताज्या बातम्या

दिया

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून हायकोर्टानं नेत्यांना फटकारलं; डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट...

0
मुंबई | Mumbaiमुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून सुरू झालेल्या वादावर आता मुंबई हायकोर्टाने भाष्य केले आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सुरू...