Sunday, April 5, 2026
HomeनाशिकNashik Crime : वीस हजार संशयितांवर 'प्रतिबंधात्मक'; शहर आयुक्तालयाची २७० दिवसांत कारवाई

Nashik Crime : वीस हजार संशयितांवर ‘प्रतिबंधात्मक’; शहर आयुक्तालयाची २७० दिवसांत कारवाई

हिस्ट्रीशिटरची यादी तयार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह उपनगरातील रस्त्यावर (Upnagar Road) घडणारे शरीर व मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी टवाळखोरांना प्रतिबंध करून पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) कठोर भूमिका घेत मागील २७० दिवस अर्थात सव्वानऊ महिन्यांत तब्बल वीस हजार संशयितांबर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कारवाईनुसार संशयितांची यादी तयार असून हिस्ट्रीशिटर रडारवर असणार आहेत. टवाळखोरांचे अड्डे, माहिती व्हॉटसअॅपद्वारे कळविण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

- Advertisement -

शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत २० सप्टेंबर २०२४ पर्यंत बीस हजारपेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधितांची यादीदेखील पोलीस ठाण्यांनी तयार केली आहे. सातत्याने टवाळखोरी करणाऱ्यांसह विविध गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध मोक्का, तडीपारी, एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कलम ११२ व ११७ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाच्या किंवा गोंधळ घालणाऱ्यांना अटक (Arrested) करण्यात येते. त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत गुणवत्ता सुधार प्रतिज्ञापत्रही नोंदवून घेण्यात येते. यासह पुन्हा एखाद्या गुन्ह्यांत किंवा उपद्रवात सहभाग आढळल्यास कठोर कारवाईची ताकीद देण्यात येत आहे.

कारवाई सुरुच

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, गुन्हे व विशेष शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी संबंधित वरिष्ठ निरीक्षकांना सूचित केले आहे. त्यान्वये ही कार्यवाही झाली आहे.

मुद्दे

  • गंभीर गुन्ह्यांतील संशयितांची यादी एसीपी कार्यालयांकडून तयार
  • संशयितांविरुद्ध तडीपारी, मोक्कांतर्गत कारवाई प्रस्तावित
  • टवाळखोर कारवाईत पंचवटी पोलीस ठाणे अग्रस्थानी
  • २० हजार १५६ जणांवर कारवाई
  • पंचवटी व नाशिकरोड हद्दीत २ हजारांहून अधिक कारवाई
  • महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ११२ आणि ११७नुसार कारवाई
  • टवाळखोरांबाबत ९९२३३२३३११ या व्हॉटसअॅप हेल्पलाइनवर तक्रार करा

ताज्या बातम्या

Nashik News : विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

0
नाशिक | Nashik विस्डम हाय ग्रुप ऑफ स्कूल्सच्या (Wisdom High International School) विद्यार्थ्यांनी (Student) कुंभाथॉन द इन्क्युबेशन सेंटर आयोजित युरेका आयडिया बॉक्स या उपक्रमात उत्कृष्ट...