Sunday, June 14, 2026
Homeक्राईमTrimbakeshwar Crime News : 'त्या' व्यक्तीच्या खूनप्रकरणी संशयितास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Trimbakeshwar Crime News : ‘त्या’ व्यक्तीच्या खूनप्रकरणी संशयितास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

येथील कैलासराजा नगर भागातील सुंदरवाडी बंधाऱ्याजवळ सोमवार (दि.२०) रोजी एका व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) खोल जागेत आढळून आला होता. यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) तपास केला असता मयताचे नाव श्रावण विठोबा गमे (वय ४७)असे समोर आले होते. यावेळी मयताच्या अंगावरील खूनांवरून पोलिसांना घातपाताचा संशय आला होता.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि तांत्रिक पुरावे लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केला असता याप्रकरणी सुंदर वाडीतीलच वसंत सोमनाथ झोले यास अटक (Arrested) केली आहे. मयत गमे हा जनावरे चारण्यासाठी गेला असता त्यावेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मयताच्या नातेवाईकांनी त्र्यंबकेश्वर पोलीसांची भेट घेऊन संशयित आरोपी सापडावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता नातेवाईकांच्या मागणीला यश आले आहे.

दरम्यान, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,डीवायएसपी वासुदेव देसले, यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह पोलीस हवालदार राजेश गावित, मुळाणे, जाधव, बोराडे, राठोड, ठाकरे यांच्या पथकाने तपास करून संशयित आरोपीस (Accused) अटक केली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...