Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : अंडरट्रायलचा भार फक्त ५ न्यायालयांवर! जिल्ह्यातील तब्बल १,१३६...

Nashik News : अंडरट्रायलचा भार फक्त ५ न्यायालयांवर! जिल्ह्यातील तब्बल १,१३६ कच्चे कैदी निकालाच्या प्रतीक्षेत 

१६ न्यायालयांत एकही कच्चा कैदी प्रलंबित नाही 

नाशिक | भारत पगारे | Nashik

जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये (Court) प्रलंबित खटल्यांमधील कच्च्या कैद्यांची (अंडरट्रायल) आकडेवारी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीच्या  अंडरट्रायल अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ३१ न्यायालयीन आस्थापनांमध्ये एकूण ७२६ खटले आणि तब्बल १,१३६ कच्चे कैदी न्यायनिवाड्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, या एकूण संख्येपैकी तब्बल ८२ टक्क्यांहून अधिक कच्चे कैदी (९२६ कैदी) केवळ जिल्ह्यातील ५ प्रमुख न्यायालयांमध्ये अडकून पडले आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यातील १६ न्यायालयांमध्ये कच्च्या कैद्यांची संख्या शून्य असल्याची दिलासादायक बाबही समोर आली आहे.  

- Advertisement -

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची सुनावणी (Hearing) जिथे होते, त्या जिल्हा व सत्र न्यायालयांवर कच्च्या कैद्यांच्या खटल्यांचा सर्वाधिक भार आहे. एकूण ७२६ प्रकरणांपैकी ५९९ प्रकरणे (८२.५० टक्के) आणि १,१३६ कैद्यांपैकी ९२६ कैदी (८१.५१ टक्के) पाच न्यायालयांत प्रलंबित आहेत. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात २२३ प्रकरणात ३६७ कच्चे कैदी आहेत. यासह नाशिकराेड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयातील १२४ प्रकरणांत २१२ कच्चे कैदी आहेत.

शिवाय, मालेगाव जिल्हा न्यायालय-१ एकमधील १२७ प्रकरणात १८४ कच्चे कैदी आहेत. तर, नाशिकच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयांत ९७ प्रकरणांत १५६ कच्चे कैदी आहेत. तसेच, निफाड न्यायालयातील ७२ प्रकरणांत १०७ कच्चे कैदी आहेत. वरील पाचही न्यायालयांची एकत्रित प्रकरणे ६४३ असून त्यातील कच्च्या कैद्यांची संख्या १,०२६ इतकी आहे.

​१६ न्यायालये अंडरट्रायल मुक्त

​या अहवालातील सर्वात सकारात्मक बाजू म्हणजे जिल्ह्यातील ३१ पैकी तब्बल १६ न्यायालयांमध्ये एकही कच्चा कैदी प्रलंबित नाही. यामध्ये पिंपळगाव बसवंत, हरसूल (ग्राम न्यायालय), दिंडोरी, सिन्नर (वरिष्ठ स्तर), नाशिक (वरिष्ठ स्तर व मोटार वाहन न्यायालय), सुरगाणा, त्र्यंबकेश्वर (ग्राम न्यायालय), सटाणा, मनमाड (रेल्वे न्यायालय), पेठ, इगतपुरी (वरिष्ठ स्तर), बालन्याय मंडळ (नाशिक), नाशिक रोड (वरिष्ठ स्तर) आणि देवळा (ग्राम न्यायालय) यांचा समावेश आहे.

तालुका स्तरावरील न्यायालयांची स्थिती

​अतिरिक्त जिल्हा न्यायालय, येवला: २८ प्रकरणे (४० कैदी)
​दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, मालेगाव: ११ प्रकरणे (१८ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, येवला: १० प्रकरणे (१० कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, सिन्नर: ९ प्रकरणे (१३ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, नाशिक रोड: ६ प्रकरणे (६ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, इगतपुरी: ५ प्रकरणे (६ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, चांदवड: ४ प्रकरणे (७ कैदी)
​दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, निफाड: ४ प्रकरणे (४ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, नांदगाव: ३ प्रकरणे (३ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, कळवण: २ प्रकरणे (२ कैदी)
​दिवाणी व फौजदारी न्यायालय, मनमाड: १ प्रकरण (१ कैदी)

  

ताज्या बातम्या

ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत शेतकर्‍यांना ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करता...