Monday, September 7, 2026
HomeनगरCrime News : किरकोळ कारणातून तरूणाला बेल्टने मारहाण

Crime News : किरकोळ कारणातून तरूणाला बेल्टने मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

डंपरचा टायर फुटल्याच्या कारणावरून तरूण चालकाला शिवीगाळ करून कमरेच्या बेल्टने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील भोरवाडी शिवारात घडली. याप्रकरणी चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या मालकाविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर देविदास शिंदे (वय 30, रा. एकनाथनगर, केडगाव, मुळ रा. करंजी, ता. आष्टी, जि. बीड) असे जखमी चालकाचे नाव आहे. भाऊ शेटे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. शेटे मळा, लिंक रोड, केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी सव्वादोनच्या सुमारास फिर्यादी सागर शिंदे हे डंपर घेऊन भोरवाडी परिसरात गेले होते. त्यावेळी डंपरचा टायर फुटल्याने त्यांनी मालक भाऊ शेटे याला फोन करून घटनेची माहिती दिली.

- Advertisement -

त्यावरून त्याने, तू मुद्दाम टायर फोडतोस. भरलेल्या गाडीचे टायर फुटत नाहीत, मग मोकळ्या गाडीचे टायर कसे फुटतात? असे म्हणत शिवीगाळ केली. कमरेच्या बेल्टने फिर्यादीला मारहाण केली. तसेच घटनास्थळी पडलेल्या लाकडी दांडक्यानेही मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण केल्यानंतर संशयिताने फिर्यादीला तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तू माझे एक लाख रुपये घेऊन पळून गेला असे सांगून तुला आणून येथे हाणत आहे. तुला जेलमध्ये टाकीन आणि प्लांटमध्ये टाकून मारून टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर...

0
पुणे । Pune महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC...