Monday, November 9, 2026
HomeनगरAhilyanagar : मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग

Ahilyanagar : मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्टेशन रोडवरील भुतारे मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने पाच गाड्यांद्वारे पाण्याचा मारा करत दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गोडाऊन जवळील एका झाडाझुडपात लागलेल्या छोट्या आगीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या आगीत मंडप व डेकोरेशनच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

रविवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास गोडाऊन परिसरातून धुराचे लोट दिसताच नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. छोट्या व मोठ्या गाड्यांद्वारे पाणी मारून दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात पथकाला यश आले. दरम्यान, आगीची धग कायम असल्याने एमआयडीसी व व्हीआरडीईच्या अग्निशमन दलाकडून मदत घेऊन पुन्हा पाण्याचा मारा करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह आमदार संग्राम जगताप, नगरसेवक मनोज कोतकर, मयूर बांगरे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गोडाऊनमध्ये मंडप व डेकोरेशनचे साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरूनही धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

AMC : महापालिकेच्या घंटागाडी नियोजनाचा बोजवारा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहोचते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कचरा संकलनाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घराघरांवर क्यूआर कोड...