Friday, April 24, 2026
Homeक्राईमतरुणाला घरात घुसून मारहाण; बहिणीची काढली छेड

तरुणाला घरात घुसून मारहाण; बहिणीची काढली छेड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बाकडे तोडल्याच्या रागातून तरुणाला घरात घुसून मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या बहिणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना मंगळवारी (25 जून) रात्री साडेअकराच्या सुमारास सबजेल चौक परिसरात घडली. याप्रकरणी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (26 जून) दुपारी तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अक्रम अर्शद खान, आदिल अर्शद खान, अझीम अर्शद खान (सर्व रा. झारेकर गल्ली, सबजेल चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मारहाणीत पीडित फिर्यादी व त्यांचा भाऊ जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी घरामध्ये जेवण करत असताना अक्रम, आदिल, अझीम बळजबरीने त्यांच्या घरात घुसले. गौसपार्क, सबजेल चौक येथील बसण्याकरिता असलेले बाकडे का तोडले, असे म्हणून त्यांनी फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण केली.

त्याला सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये गेल्या असता त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करण्यात आले. घराच्या दरवाजावरती जोरजोरात लाथा मारून तुम्ही येथे कसे राहतात, तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार अडसरे करत आहेत.

ताज्या बातम्या

IPL 2026 : चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार की ‘डेडलॉक’ सुटणार?...

0
बेंगळुरू । Bengaluru आयपीएल २०२६ चा थरार आता रंगात आला असून, आज क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयटी सिटी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खिळल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स...