Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमCrime News : युवकावर कोयत्याने हल्ला, सोन्याची चैन लुटली

Crime News : युवकावर कोयत्याने हल्ला, सोन्याची चैन लुटली

माजी नगरसेवक दंडा टोळीचा धुडगूस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नाझसाब चौकात 14 ऑगस्ट रोजी रात्री माजी नगरसेवकासह दंडा टोळीतील नऊजणांनी स्क्रॅप व्यवसायिक युवकावर हल्ला करून गळ्यातील सोन्याची चैन लुटल्याची धक्कादायक घटना घडली. अबुताला अकिल शेख (वय 24, रा. इब्राहीम कॉलनी, जी.पी.ओ. चौक) हा युवक या हल्ल्यात जखमी झाला असून सध्या तो खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
अबुताला शेख यांने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, नजिर जहागीरदार उर्फ नज्जु पहिलवान, इम्रान जहागीरदार, इम्तियाज जहागीरदार, रशिद जहागीरदार ऊर्फ रशिद दंडा, अकिब जहागीरदार, अश्रफ जहागीरदार, फैजान जहागीरदार, जिशान जहागीरदार (सर्व रा. झेंडीगेट) आणि मोईन आलम जहागीरदार (रा. फकीरवाडा) या नऊजणांनी मिळून हल्ला केला.

- Advertisement -

घटनेदरम्यान इम्रानकडे बंदूक होती, तर अकिब आणि अश्रफकडे कोयते होते. रशिद दंडा, इम्तियाज, फैजान, जिशान आणि मोईन यांनी लाकडी दांडक्यांनी अबुताला यांना बेदम मारहाण केली. यावेळी नज्जु पहिलवानने इसको जानसे मार डालो अशी आरोळी ठोकत हल्ला चढवला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अबुतालाची सोन्याची चैन अकिबने हिसकावून घेतली. एवढेच नव्हे, तर हमारे खिलाफ खडा हुआ तो जानसे मार देंगे अशी धमकी देत सर्व आरोपी दुचाकीवरून पसार झाले. जखमी अबुतालाला त्यांचे काका फरमान नसिर शेख यांनी तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी दाखल होत नऊ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...