Tuesday, October 27, 2026
Homeक्रीडाCrime News : माळीवाडा बसस्टँड परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला

Crime News : माळीवाडा बसस्टँड परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

माळीवाडा बसस्टँड येथे किरकोळ वादातून एका तरूणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात शहनवाज सलीम शेख (वय 38 रा. मुकुंदनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून फमति, रयान, फैजान (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) व इतर अनोळखी चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (06 मार्च) सायंकाळी 7:15 ते 7:45 च्या सुमारास घडली. फिर्यादी शहनवाज हे रोजच्या प्रमाणे सफर ट्रॅव्हल्स कार्यालयात कामासाठी गेले होते.

- Advertisement -

रात्रीच्या सुमारास ते माळीवाडा बसस्टँड जवळील स्वच्छतागृहातून परतत असताना रस्त्यावर एक मॅक्स चारचाकी वाहन आडवे उभे असल्याचे दिसले. त्यांनी वाहनाच्या चालकाला रस्ता अडवू नकोस, असे सांगताच, तेथे उभ्या असलेल्या फमति याने संतापून शिवीगाळ सुरू केली. यावर शहनवाज यांनी त्याला शांत राहण्यास सांगून तेथून निघून गेले. यानंतर काही वेळाने शहनवाज एम. के. रॉयल ट्रॅव्हल्स कार्यालयाजवळ असताना फमति, रयान, फैजान आणि अन्य चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी लाथाबुक्क्यांनी, दगडांनी तसेच कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात शहनवाज यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि दंडावर गंभीर जखम झाली. तसेच पाठीवर, डोक्यावर आणि गुप्तांगावरही मार लागला आहे.

दरम्यान, या हल्ल्यावेळी एस. के. ट्रॅव्हल्समधील कर्मचारी मोसिन शेख, वसिम बागवान, जावेद शेख आणि काही रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेत शहनवाज यांना वाचवले. संशयित आरोपी पळून गेल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस अंमलदार औटी करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मुळातून बंधारे आणि शेतीसाठी प्रत्येकी एक आवर्तन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुळा उजवा कालव्यातून बंधार्‍यांना, पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत एक आवर्तन तसेच मुळा डावा कालव्यातून जानेवारी ते मार्च 2027...