Sunday, September 27, 2026
Homeक्राईमCrime Story : चौदा महिन्यांनंतर दारूच्या नशेत फुटला बेपत्ता भावाच्या खुनाचा 'सस्पेन्स'

Crime Story : चौदा महिन्यांनंतर दारूच्या नशेत फुटला बेपत्ता भावाच्या खुनाचा ‘सस्पेन्स’

नाशिक | भारत पगारे | Nashik

चित्रपटातील दृश्यमच्या कथांमधून प्रेरणा घेऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढत असली, तरी कायदा आणि खाकीच्या नजरेतून सुटणे कठीण असते, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरवून सोडले होते. घरातून बेपत्ता झालेल्या एका चालकाचा तब्बल १४ महिन्यांनंतर खून झाल्याचे निष्पन्न झाले.

- Advertisement -

विशेष म्हणजे, ज्या भावाने अगदी दृश्थम स्टाईलने हा सर्व प्रकार लपवून पोलिसांची दिशाभूल केली, त्याच्याच एका चुकीमुळे आणि दारूच्या नशेत निसटलेल्या एका वाक्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला. ४ जानेवारी २०२३ रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अविनाश तुकाराम साळवे (वय ४१, रा. संभाजीनगर) हे ड्रायव्हर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. ३ जानेवारीच्या रात्री चुलत जातो सांगून भावाकडे असे निघालेले अविनाश परत आलेच नाहीत.

पोलिसांनी शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा न लागल्याने ही फाईल धूळ खात पडून राहिली. कौटुंबिक आशाही मावळल्या होत्या. मात्र, तब्बल १४ महिन्यांनंतर म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. अविनाशचा चुलत भाऊ राहुल उर्फ बाळ्या साळवे हा मित्रांसोबत दारूच्या पार्टीत बसला होता. नशेत जुन्या आठवणी निघाल्या आणि बाळ्याच्या तोंडून अचानक शब्द निसटले, मीच चौक संपवलंय त्याला पार्टीत हजर असलेल्या एका व्यक्तीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली अन् थेट अविनाशच्या पत्नीची भेट घेऊन कानात सांगितली.

पत्नीने क्रांती पोलिस ठाणे गाठून घातपाताचा संशय व्यक्त केला, तत्कालीन उपनिरीक्षक व सध्या उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत प्रभाकर सोनवणे यांनी बाळ्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बाळ्याने खाकीचा हिसका दाखवताच कबुली दिली. त्याने सांगितले की, महामार्गालगतच्या जलवाहिनीच्या खड्यात मृतदेह पुरला आहे. महसूल विभाग आणि जेसीबी घेऊन पोलिसांनी तो परिसर उकरला, पण तिथे संपूर्ण सापळ्याऐवजी फक्त एका हाताचे हाड सापडले! बाळ्या पोलिसांची दिशाभूल करतोय, हे सोनवणे यांच्या नजरेने तातडीने हेरले. सोनवणे यांनी बाळ्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला, बाळ्याने सांगितलेली वेळ आणि त्याचे लोकेशन जुळत नव्हते. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जेव्हा त्याला पुन्हा पोलिसी पाहुणचार देण्यात आला, तेव्हा त्याने खरी आणि थरकाप उडवणारी हकीकत सांगितली.

तिघेही गजाआड

दृश्चम चित्रपटाप्रमाणेच मृतदेहाचे तुकडे, राख आणि पुरावे नष्ट करून पोलिसांना चकवा देण्याचा बाळ्याचा प्लॅन होता. मात्र, दारूच्या नशेत फुटलेली जबानी आणि प्रभाकर सोनवणे यांच्या सूक्ष्म तांत्रिक विश्लेषणामुळे हा बनाव उघडा पडला. या प्रकरणी पोलिसांनी चुलत भाऊ बाळ्या, प्याचे वडील किसन साळये आणि बहीण लता उन्हाळे या तिघांनाही बेड्या ठोकल्या.

असा रचला होता कट आणि विल्हेवाट

जमिनीच्या जुन्या वादातून ३ जानेवारी २०२३ च्या रात्री बाळ्याने अविनाशच्या डोक्यात लाकडी बल्ली मारून त्याची हत्या केली. त्यानंतर वडील किसन साळवे आणि बहीण लता उन्हाळे यांच्या मदतीने मृतदेह दाट झाडीत नेऊन लाकडांच्या साहाय्याने जाळला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ्या त्या ठिकाणी गेला असता, भटके कुत्रे अविनाशच्या अर्धवट जळालेल्या एका हालाचे लचके तोडत होते. बाळ्याने कुत्र्यांना हुसकावून तो हात आणि राख एका गोणीत भरली अन् महामार्गाच्या खकुधात गाडून टाकली! पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो अनेक दिवस या परिसरात फेन्या मारून परिस्थिती सामान्य आहे का हे पाहत होता.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...