नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कुलमाग हल्ल्याचा मास्टर माइंड, लश्कर ए तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भटचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. लतीफ भट एका मशिदीत लपला होता. त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते. पण त्याने नकार दिला होता. मला अल्लाहकडे जायचे आहे, असे म्हणत त्याने सरेंडर करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सुरक्षा दलाने त्याला घेरुन अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जेव्हा तो मशिदीतून बाहेर आला, तेव्हा लगेच त्याला गोळ्या घालण्यात आला. कुलमाममध्ये सुरक्षा दलाने ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांनी मंगळवारी सीसीटीव्ही फुटेजही जारी केले. ज्यामध्ये ११ नोव्हेंबरला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलाच्या एका चौकीवर हल्ला करण्यापूर्वी डार आणि भट हे दोन अतिरेकी रेकी करत होते. यावेळी त्यांनी तीन जवानांवर गोळीबार करत त्यांना जखमी केले होते. आता भटला जेव्हा आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा तो अल्लाहला भेटायचे आहे असे म्हणाला. सोमवारी कुलगाम या ठिकाणी जी लष्करी कारवाई झाली त्यात लतीफचा साथीदार असलेला उमर निसार हा दहशतवादी ठार झाला आहे. आता लतीफ भटलाही सुरक्षा दलाने कारवाई करत ठार मारले आहे.
Kulgam, Jammu & Kashmir | The body of one neutralised terrorist, along with a weapon, has been recovered from the encounter site in Kulgam district. The terrorist neutralised during the joint operation has been identified as Mohd Lateef Bhat, a resident of Khrewan, Kulgam. Further details are awaited: Police— ANI (@ANI) November 18, 2026
लतीफ भट बुधवारी रात्री २.४५ वाजता मशिदीत आला तेव्हा गोळीबार करण्यात आला. त्याला बाहेर काढण्यासाठी आधी त्याच्याशी संवाद साधण्यात आला. पण त्याने ऐकले नाही. त्यामुळे अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. धार्मिक स्थळाला कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. मशिदीत घुसून सुरक्षा दलाने कोणतीही कारवाई केली नाही. तो बाहेर येण्याची वाट पाहिल्या गेली, असं अनायत अली यांनी सांगितलं.
लतीफ भट १८ नोव्हेंबर २०२५ रोजी लश्कर ए तोयबामध्ये सामील झाला होता. कथितपणे त्याने स्वत:च कट्टरपंथी व्हायचे ठरवले होते. सीमेपलिकडून त्याला जम्मू-काश्मीरमधील सौहार्द, पर्यटन आणि अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचे आदेश देण्यात आले होते.
रेकी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दहशतवाद्यांनी अखरान परिसरातील सीआरपीएफच्या नाक्यावर अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर हे दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास केला असता त्यामागे लतीफ भट असल्याचं समोर आले होते. त्यामुळे सुरक्षा दलाने त्याच्या विरोधात ऑपरेशन सुरू केले होते.




