Sunday, September 27, 2026
Homeक्राईमCrime Story : रचला परफेक्ट मर्डरचा कट; पोलिसांनी उघड केला काकाचा खून

Crime Story : रचला परफेक्ट मर्डरचा कट; पोलिसांनी उघड केला काकाचा खून

नाशिक | Nashik

काळोखाची दाट शाल आणि शेतातील शांतता… याच शांततेचा फायदा घेत एका २१ वर्षांच्या तरुणाने आपल्या सख्ख्या काकाचा काटा काढला. प्रकरण जमिनीच्या वादाचे होते. खून केल्यानंतर हा केवळ एक अपघाती मृत्यू आहे, असा भास निर्माण करण्यासाठी त्याने मृतदेह नाल्याकाठी नेऊन टाकला. तरुणाला वाटले की त्याने परफेक्ट मर्डर केला आहे, पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने आणि फॉरेन्सिक बारकाव्यांनी हा कट अवघ्या काही तासांत उधळून लावला. जळगावच्या (Jalgaon) गारखेडा (ता. रावेर) येथील या थरारक हत्याकांडामागील पडद्यामागील कहाणी आता समोर आली आहे.

- Advertisement -

गारखेडा येथील रामा थावरू बारेला (वय ४६) आणि त्यांचा सख्खा पुतण्या अनिल (वय २१) जखा बारेला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या तुकड्यावरून सतत भांडणे होत होती.२१ जुलै २०२६ ची सायंकाळ नेहमीसारखीच शांत होती, सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा जमिनीवरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर भयंकर रागात झाले. संतापाच्या भरात अनिलने जवळच पडलेली लाकडी काठी उचलली आणि थेट काका रामा यांच्या डोक्यावर जोरदार वार (Attack) केला.

वार इतका भीषण होता की, रामा बारेला जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्याचा मृत्यू झाला. काकाचा मृतदेह (Dead Body) समोर पडलेला पाहून अनिल क्षणाधार्धात हादरला, पण नंतर त्याच्या डोक्यात गुन्हेगारी फितूर जागी झाली. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने या हत्येला अपघाताचे रूप देण्याचा कट रचला. रात्रीचा काळोख वाढण्याची तो वाट पाहू लागला. रात्रीच्या अंधारात त्याने काकाचा मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेला आणि पायवाटे जवळील एका नाल्याच्या कडेला फेकून दिला.

लोकांचा आणि पोलिसांचा (Police) हाच समज व्हावा की, रामा है रात्रीच्या अंधारात तोल जाऊन नाल्यात पडले आणि डोक्याला मार लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा बनाव रचून अनिल शांतपणे निघून गेला. रात्री ११:०० वाजेच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे एका इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला, तरी पोलिसांना काहीतरी मिसिंग असल्याचे जाणवले.

काही तासांत आरोपी जेरबंद

पोलिसांनी अनिलला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. २२ जुलैच्या रात्री पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने अवघ्या काही तासांत हा परफेक्ट मर्डरचा बनाव उधळून लावला.

असा उघडकीस आला कट

तपासादरम्यान पोलिसांना मृत रामा बारेला यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसले. परंतु, केवळ नाल्यात पडल्याने इतकी खोल आणि विशिष्ट प्रकारची दुखापत होणे अशक्य होते. रावेर पोलिसांनी वैज्ञानिक पद्धत आणि तांत्रिक माहितीचा वापर सुरू केला. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर पोलिसांना जमिनीवर मृतदेह ओढत नेल्याचे काही खूण / पुरावे आढळले. तसेच स्थानिक चौकशीतून जमिनीच्या वादाची माहिती समोर आली. संशयाची सुई थेट पुतण्या अनिल बारेलाकडे वळली.

ताज्या बातम्या

Maharashtra SIR News : राज्यात एसआयआरला मुदतवाढ; दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने शनिवारी मुदतवाढ दिली. मुख्य निवडणूक...