Thursday, March 13, 2025
Homeक्राईमशिर्डी येथून हद्दपार सराईत गुन्हेगार जेरबंद

शिर्डी येथून हद्दपार सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेकडून 3 अवैध दारू विक्रेत्यांवर छापे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार दीपक वाघमारे याला सावळीविहीर येथून त्याच्या राहत्या घरातून जेरबंद केले. तसेच शिर्डी शहरात 3 ठिकाणी अवैध दारू विक्री करणार्‍या गुत्त्यावर छापे टाकत सुमारे 16 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरूध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिलेे आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, बाळासाहेब नागरगोजे, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव व महादेव भांड अशांचे पथक नेमले.

- Advertisement -

हे पथक बुधवारी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमधील फरार आरोपी व अवैध धंद्याची माहिती घेत असताना गुप्तबातमीदारा मार्फत हद्दपार असलेला राहुल उर्फ दीपक विलास वाघमारे, रा. सावळीविहीर येथे त्याचे राहते घरी असल्याची अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पथकाने सावळीविहीर येथे जावून राहुल वाघमारे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.
तसेच पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू बाळगणार्‍या इसमांची माहिती काढून पंचासमक्ष 3 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. त्यामध्ये 16 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, व शिर्डी उपविभागाचे शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...