Monday, May 4, 2026
Homeक्राईमJamkhed News : पुण्यातून आलेल्या तिघांनी केली मोहळकरवर फायरिंग

Jamkhed News : पुण्यातून आलेल्या तिघांनी केली मोहळकरवर फायरिंग

हालचालींची माहिती देणारा गजाआड || पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार

अहिल्यानगर/जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar | Jamkhed

पुणे येथून आलेल्या तिघांनी पूर्ववैमनस्यातून पैलवान सागर किसन मोहळकर (रा. जामखेड) याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार (Gavathi Katta Firing) करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्या तिघांना मोहळकरच्या हालचालींची माहिती देणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB Police) गजाआड केले आहे. अभिमन्यु महादेव पोते (वय 24, रा. भुतवडा रस्ता, जामखेड) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

त्याच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस (Live Cartridge), दुचाकी व मोबाईल असा सुमारे 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तपनेश्वर रस्ता ते खाडेनगर मार्गावरील नुराणी कॉलनी येथे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी मोहळकर याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या घटनेत मोहळकर याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी किसन चांगदेव मोहळकर (रा. जांबवाडी, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) अज्ञात व्यक्तीविरूध्द खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge), अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ परिसरात चौकशी करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना अभिमन्यु महादेव पोते हा जिक्री (ता. जामखेड) गावाच्या शिवारात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे व चिन्या (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. कोथरूड, पुणे) या साथीदारांसह सागर मोहळकर याला जीवे मारण्याचा कट रचल्याची कबुली दिली. अभिमन्यु पोते याने मोहळकर याच्या हालचालींची माहिती साथीदारांना दिल्यानंतर त्यांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार (Firing) केल्याचे तपासात उघड झाले आहे.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...