Saturday, August 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिवाळीच्या खरेदीसाठी नाशिकच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी

दिवाळीच्या खरेदीसाठी नाशिकच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी

दिवाळीच्या तोंडावर रविवारी नाशिकच्या बाजारपेठांत ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली. सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने आणि आठवड्याच्या सुट्टीचा दिवस असल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर खचाखच भरल्या आहेत. शालिमार, पंचवटी, मेन रोड, सराफ बाजार, सीबीएस, कॉलेज रोड, नाशिकरोड, इंदिरानगर आणि नवीन नाशिक परिसरांत खरेदीदारांचा ओघ सकाळपासूनच वाढत गेला.

कपडे, फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, भाजीपाला आणि घरगुती वस्तूंच्या दुकानांत ग्राहकांची झुंबड उडाली. विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपड्यांच्या दुकानांमध्ये आणि फटाक्यांच्या स्टॉलवर लांबच लांब रांगा दिसून आल्या.गर्दी वाढल्यामुळे पार्किंगची समस्या तीव्र झाली. सराफ बाजार आणि सीबीएस परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. पायी फिरणार्‍या नागरिकांनाही गर्दीतून वाट काढणे अवघड झाले.

काही भाजी मार्केटमध्ये दरवाढ झाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत रविवारी विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा उत्साह वाढल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले.

ताज्या बातम्या

दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा, मुख्यमंत्री नाशिकला येतील आणि रस्त्यावरील खड्डे...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने नाशिकला आले म्हणून शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले, अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिकच्या...