महिलांवरील हिंसाचार निर्मूलन आंतरराष्ट्रीय पंधरवडा जगभर साजरा होत आहे. महिलांवरील हिंसाचार ही गंभीर आणि सतत चर्चिली जाणारी समस्या आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील महिलांना विविध प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागते. मारहाण, अॅसिड हल्ला, हुंडाबळी, सन्मान्य हत्या (ऑनर किलिंग), शारीरिक अत्याचार, बलात्कार, आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सायबर वर्ल्डची काळी बाजू अशाप्रकारच्या हिंसेचा महिला बळी ठरतात. यामुळे होणारे मानसिक विकार हादेखील त्याच हिंसेचा एक भाग मानला जायला हवा.
हे देखील वाचा – संपादकीय : २८ नोव्हेंबर २०२४ – लोकसहभाग महत्वाचा
याबाबतीत सामाजिक पातळीवर जाणिवेचाच अभाव आढळतो. मग मानसिक विकारांचा स्वीकार ही फार दूरची गोष्ट आहे. हिंसाचाराची समस्या संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. काही सामाजिक संस्था आणि वैयक्तिक पातळी असे त्याचे सामान्य स्वरूप आढळते. तथापि समाजात खोलवर रुजलेली ही समस्या निकाली काढण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांना व्यापक स्वरूप द्यावे लागेल. अशा हिंसाचाराच्या विरोधात लढण्यासाठी कायदे आहेत, पण ते न्याय मिळवून देण्यास सक्षम असावेत का? अशा प्रकरणांमध्ये तपास आणि न्याय मिळण्यास विलंब आढळतो.
हे देखील वाचा- संपादकीय : २७ नोव्हेंबर २०२४ – सुवर्णमध्य समाजमान्य ठरू शकेल
निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये असे न्यायतत्त्व सांगितले जाते. ते योग्यच, पण विलंब फक्त पीडितांचेच खच्चीकरण करत नाही तर इतरांची न्याय मागण्याची उर्मी दाबून टाकत असू शकेल. काहीही होत नाही, अशी भावना हिंसा सहन करायला भाग पाडत असू शकेल का? जलद न्याय मिळवून देण्यासाठी कायदे सक्षम असायलाच हवेत. ती सरकारची जबाबदारी आहे. अन्याय करणार्याइतकाच तो सहन करणाराही दोषी असतो असे म्हटले जाते. तथापि कोणतीही, विशेषतः घरगुती हिंसा हा अन्याय आहे याची जाणीव महिलांमध्ये अभावानेच आढळते.
हे देखील वाचा- संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२४ – जीवनगाणे गातच राहावे
थोडेफार सहन करावेच लागते, मारणे हा नवर्याचा अधिकार आहे अशीच बहुसंख्य महिलांची भावना आढळते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अनेक महिलांनी तसे मान्य केल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. एक व्यक्ती म्हणून स्वतःकडे बघण्याची दृष्टी महिलांना शिक्षणामुळे मिळू शकेल. महिला स्वतःकडे व्यक्ती म्हणून बघायला शिकल्या तर त्याचा प्रतिसाद तसाच मिळण्याची शक्यता बळावते, हे महिलांनी लक्षात घ्यायला हवे. अन्यथा दुय्यम स्थानाच्या त्याच इतक्या प्रभावात आढळतात की अन्याय झाल्याचे बहुसंख्यांना जाणवतदेखील नाही किंवा जाणवले तरी त्यांचे मन मानत नाही. ती जाणीव व्यापक पातळीवर रुजायला हवी.
हे देखील वाचा – संपादकीय : २५ नोव्हेंबर २०२४ – महिलांच्या मानसिकतेवर प्रभाव
आधुनिक तंत्रज्ञान महिलांनी थोडेतरी शिकायला हवे. जेणेकरून सायबर जगताच्या काळ्या बाजूत त्या फसणार नाहीत. महिलांच महिलांवर अन्याय करतात असे समाज मानतो. कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत तसे आढळतेदेखील. न्यायासाठी महिलांनी महिलांची साथ द्यायला हवी. हिंसाचार रोखण्यासाठी एकत्र यायला हवे. सामूहिक शक्ती कोणा एकीवर होणारा अन्यायदेखील टाळू शकते. यावर्षीच्या हिंसाचार प्रतिबंधक दिवसाची तीच संकल्पना आहे. ‘एकत्र या आणि कृती करा’ त्यातील गर्भितार्थ महिला लक्षात घेतील का?
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा