Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा; जल संकटातून सुटका

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा; जल संकटातून सुटका

नाशिक । प्रतिनिधी
गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यातील धरणात २४ धरणात ४४ टक्के इतका समाधानकारक जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण १८ टक्के इतके होते. उपलब्ध जलसाठयावर एक ते दीड महिना जिल्हयाची तहान भागवायची आहे.
पिण्यासाठी पाणी व सिंचन यासाठी  गोदावरी व दारणा समूहातून तीन हजार दलघफू इतके आवर्तन सोडण्यात आले आहे. यंदा मे महिना उजाडला तरी धरणांमध्ये तीन ते चार महिने पुरेल इतका जलसाठा आहे. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. सप्टेंबर अखेर सर्व धरणे अोव्हर फ्लो झाली होती.
गोदावरी, दारणा नद्यांना महापूर आला होता. मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी शंभर टक्के भरले होते. अगदी डिसेंबर पर्यंत  परतीचा पाऊस सुरु होता.
त्यामुळे जानेवारीपर्यंत धरणांमध्ये   ७० टक्क्यांहून जादा पाणी होते. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मागील काही दिवसांपासून धरणांमधून आवर्तन सुरु आहे. तसेच नगरसाठी देखील आवर्तन सोडले जात आहे.
त्यामुळे धरणांमधील जलसाठा ४४ टक्क्यावर आला आहे. पुरेसा जलसाठा असल्याने यंदा पाणिबाणी सारखी परिस्थिती उद् भवणार नाही. आॅगस्ट पर्यंत पुरेल इतका साठा धरणांमध्ये आहे. तर नाशिक शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरण समूहात ४९ टक्के इतका जलसाठा आहे.
धरणातील पाणीसाठा (टक्के)
गंगापूर – ४४
कश्यपी – ८९
गौतमी गोदावरी – ३४
आळंदी – ३३
पालखेड – ३४
करंजवण – २९
वाघाड – २०
अोझरखेड – ४८
पुणेगाव – २८
तिसगाव – २०
दारणा – ७६
भावली – ३७
मुकणे – ४४
वालदेवी – २७
कडवा – ‍१३
नांदूरमध्यमेश्वर – ९९
भोजापूर – २०
चणकापूर – ३८
हरणबारी – ५५
केळझर – २३
नागासाक्या – २२
गिरणा – ४१
पुनद – ५६
- Advertisment -

ताज्या बातम्या