Friday, April 24, 2026
HomeनगरSangamner : भोंदू गडगेचा ‘दत्तधाम दरबार’ सील

Sangamner : भोंदू गडगेचा ‘दत्तधाम दरबार’ सील

पोलिसांकडून स्पॉट पंचनामा || झाडाझडती, अनेक औषधे ताब्यात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’ चालवणार्‍या भोंदू राजेंद्र गडगे याच्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गडगेच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण परिसर सील केला असून तब्बल चार तास झाडाझडती घेण्यात आली. या कारवाई दरम्यान दरबारात स्पॉट पंचनामा करण्यात आला. तसेच विविध औषधांचे नमुनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेंद्र गडगेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून गडगेच्या कथित दरबारामागील संपूर्ण जाळं उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. भोंदू गडगे हा विविध आजारांवर चमत्कारिक उपचार करण्याचा दावा करत नागरिकांची दिशाभूल करत होता.

या पार्श्वभूमीवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते यांच्यासह पोलिसांनी दरबारावर छापा टाकत संपूर्ण परिसर सील केला. जवळपास चार तास चाललेल्या या कारवाईत सखोल झाडाझडती घेण्यात आली. कारवाईदरम्यान घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा करण्यात आला असून विविध प्रकारच्या औषधांचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या औषधांच्या माध्यमातून नागरिकांना भुलवून आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

0
नाशिक| जिमाका वृत्तसेवा Nashik ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’च्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात येणार असून,जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग वाढविणे आणि शाश्वत पाणी...