Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNCP Convention : अजित पवारांकडून स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना खास कानमंत्र

NCP Convention : अजित पवारांकडून स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना खास कानमंत्र

शिर्डी | Shirdi

राज्यात लोकसभा निवडणुकीत (Loksabah Election) मोठा फटका बसल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत पार पडले होते. त्यानंतर कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अधिवेशन सुरु होते.आज या अधिवेशनाचा समारोप पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. जे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत किंवा पक्षाच्या पदासाठी उत्सुक आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. उमेदवारांनी प्रत्येक विभागानुसार एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि २५ घरांवर काम केल पाहिजे. म्हणजे एका घरात ४ मते धरली तर १०० मते मिळतील. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने ५० कार्यकर्ते तयार केले तर आपण २० हजार मतापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने १०० मतांपर्यंत पोहोचायचे आहे. तसेच यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागानुसार होईल. महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना काहींनी चारचा प्रभाग करा, काहींनी दोनचा प्रभाग करा अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आणि चारचा प्रभाग करण्यात आला”, असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “योग्य नियोजन (Planning) केलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे. पक्षाचं संघटन वाढण्यासाठी तरुण आणि तरुणींना पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा काळ असला पाहिजे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपआपल्या गावात पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गावात, गल्लीत पक्षाचा कार्यकर्ता आणि आपल्या पक्षाचा झेंडा किंवा बोर्ड लागला पाहिजे. प्रत्येक घराघरांपर्यंत आपला पक्षाचा विचार पोहचायला हवा”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

तसेच विधानसभेला (Vidhansabha) आपल्याला चांगले यश मिळाले आहे. कोणतेही यश अपयश कायम नसते, आपल्याला यात सातत्य ठिकवायचे आहे. सध्या पक्षात अनेक जण येत आहेत, पक्षाची बेरीज झाली पाहिजे. मात्र, पक्षाला कमीपणा यायला नको. जनमाणसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. चुकीचे काम करणाऱ्याची हकालपट्टी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा मी निर्णय घेतला आहे. एक सरकारी कार्यक्रम असेल तर एक पक्षाचा कार्यक्रम असणार आहे. दर महिन्याला एक मंगळवारी जिल्हाध्यक्षांची एक बैठक घेतली जाणार असून सर्व जिल्हाध्यक्षांना मी बोलावणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या