Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूज'गुलाबी जॅकेटच्या' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला अजित पवारांचे सडेतोड उत्तर; म्हणाले, 'पांढरा...

‘गुलाबी जॅकेटच्या’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला अजित पवारांचे सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘पांढरा रंग…

मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून जनसन्मान यात्रेमधून स्वतः अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यातच योजनेचे श्रेय घेण्यासाठी सरकारमध्येच चढाओढ दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यात तर योजनेच्या श्रेयवादाची लढाई अत्यंत टोकाला पोहोचली आहे.

अजित पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. राज्यातील ओला दुष्काळ, महिला सुरक्षिततेचा प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जागावाटप आदी मुद्द्यांवर दर्शनानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार?
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुलाबी जॅकेटवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिले. ‘पांढरा रंग सगळ्यात चांगला आणि शुभ्र असलेला आहे, मुख्यमंत्री म्हणतात ते योग्य आहे. मी पण आज पांढरा शुभ्र शर्ट घातला, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मागली, तसेच गणेशोत्सव आहे कशाला उगाच हे हा बोलला तो ते बोलला सांगताय,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला आलो होतो. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंगडे असल्यामुळे जास्त गर्दी नाही. बापाकडे काय मागितलं नाही. राज्यात सुख समाधान शांती सर्वांची भरभराट होऊ दे, भले होऊ दे. राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. जी काय मदत राज्याकडून केंद्राकडून करायचे असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, या परिस्थितीतून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,” असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करु नये
एका महिलेने काही दिवसापूर्वी सांगितलं गँगरेप झाला, मात्र तपासाअंती समोर आलं की तसं काही झालं नव्हतं. मात्र अशावेळी पोलिसांची संस्थेची बारामतीची बदनामी झाली, त्यामुळे अशा घटना घडता कामा नये. तक्रार आल्यानंतर एसपी आणि संबंधित हे सगळ्या प्रशासनांना ताकद लावली. माझ्या सगळ्या नावाने कारण नसताना कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नये, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन बोलताना शरद पवार यांनी १५०० रुपये देण्यापेक्षा महिलांची अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असे म्हटले होते. यावरुन अजित पवार प्रतिक्रिया दिली आहे. शंभर टक्के महिलांचे अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतोय त्याप्रमाणे आम्ही देखील करतोय. लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असे ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या