Tuesday, August 25, 2026
Homeनाशिककारच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

कारच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुंबई आग्रा महामार्गावर मुंगसे शिवारात जैन व्हीलालगत भरधाव कारने सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला.

- Advertisement -

समर्थ शरद सूर्यवंशी (10) हा विद्यार्थी महामार्गावरून शाळेत सायकलीवरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या एमएच 04 एलई 0971 या कारने पाठीमागून सायकलला धडक दिल्याने सायकलीसह समर्थ हा फेकला जावून गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी त्याचे वडिल शरद सूर्यवंशी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हवा. खुरासणे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता ‘या’ तारखेला...

0
नाशिक | Nashik नाशिक तहसील कार्यालयाच्या ( Nashik Tehsil Office) हद्दीत वाहतूक पथकाने अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या गौण खनिजाचा जाहीर लिलाव...