पेठ | प्रतिनिधी Peth
पेठ- वांगणी शिवारातील आईसाहेब ढाब्याजवळ दुचाकीला पेठकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात घटनास्थळीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला
- Advertisement -
आज पेठमधील अदिवासी गौरव दिनाची रॅली आटोपून घराकडे परतणाऱ्या अनिल काशिनाथ प्रधान (वांगणी) मोटर सायकल क्रमांक एमएच१५ जीजे २३७६ ने घराकडे सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान परतत असतांना आईसाहेब ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घटनास्थळीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रधान यांचा अपघातात मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत.




