Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपिकअप व्ह‍ॅन - दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

पिकअप व्ह‍ॅन – दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

वणी । वार्ताहर Vani

- Advertisement -

वणी – दिंडोरी रस्त्यावर पिकअप व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरी जवळ मोटरसायकल व पिकअप व्ह‍ॅन यांच्यात झालेल्या अपघातात अमोल भगवंत गवारी (21) रा. निळवंडी ता. दिंडोरी हा तरुण जागीच ठार झाला तर अनिल सुखदेव गवारी (25) व गोपी सुरेश गवारी (20) दोघेही रा. निळवंडी हे गंभीर जखमी झाले आहे.

जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. अपघातातील जखमींवर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

मनोज

Manoj Jarange Patil: तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे...

0
जालना | Jalanaमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता...