Saturday, July 25, 2026
HomeनगरNewasa : देडगाव शिवारात मुळा उजवा कालवा फोडला

Newasa : देडगाव शिवारात मुळा उजवा कालवा फोडला

अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील देडगाव गावचे शिवारातील मुळा उजवा कालवा शाखा क्र.2 वरील देडगाव शिवारात आऊटलेट क्र.1 च्या शेजारी कालव्या खालील सिमेंटच्या पाईपला छिंद्र पाडुन मुळा उजवा कालवा फोडल्याबद्दल अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुकाणा शाखा येथील कालवा निरीक्षक पोपट कचरू दरंदले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात म्हटले की, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मी ड्युटीवर असताना मी मुळा उजवा कालवा शाखा क्र.2 वरील देडगाव शिवारात आऊटलेट 1 शेजारी कालव्यावर पाहणी करण्यासाठी गेलो असता कालवा हा सुस्थीतीत होता. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मला सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्यात जात असल्याचे पाहिले.

- Advertisement -

तेव्हा आम्ही खात्री केली असता कोणीतरी अज्ञात इसमाने शेती पाणी जात असलेल्या कॅनालला कशाचे तरी सहाय्याने कॅनल मधील सिमेंटच्या पाईपला होल पाडल्याने तेथुन पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत होता. रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर कालव्यातून शेती प्रयोजनासाठी वाहुन नेत असलेल्या पाण्याच्या कॅनॉलचे पाईप फोडुन पाणी पुरवठ्यामध्ये घट होईल या पध्दतीने नुकसान केले आहे. या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालवा फोडीचे माहिती मिळताच मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिलेखनवाडी उपविभागाचे उपविभागीय अभियंता स्वप्नील देशमुख व व त्यांच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत कालव्यातील पाणी बंद करून कालवा बुजुविण्यासाठी प्रयत्न केले. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

पाटबंधारे विभागाचे आवाहन
कालवा, बंधारा किंवा इतर जलसंपदा संरचनेबाबत कोणतीही संशयास्पद हालचाल, नुकसान किंवा छेडछाड आढळल्यास त्वरित संबंधित विभागाला कळवावे. सार्वजनिक जलसंपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशरा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

माहिती देणारास 5 हजाराचे बक्षीस
मुळा पाटबंधारे उजवा कालव्याचा ड्रेन-पाईप फोडतांना अज्ञात इसमास कोणी पाहिले असल्यास किंवा फोडणाराची नावे माहित असल्यास पाटबंधारे विभागाशी संपर्क साधावा. असे कृत्य करणाराचे नाव सांगणार्‍यास 5 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...