Sunday, February 9, 2025
Homeदेश विदेशDelhi Assembly Elections : सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान; एक्झिट...

Delhi Assembly Elections : सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान; एक्झिट पोल्सचे अंदाज समोर

नवी दिल्ली | New Delhi

दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Elections) ७० जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडले. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. त्यानंतर आता या सर्व उमेदवारांचे नशीब आज ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. येत्या शनिवारी (दि.८ फेब्रुवारीला) दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिल्ली विधानसभेसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७० टक्के इतके मतदान झाले होते. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मतदानाची वेळ संपली. दरम्यान, मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून त्यानुसार दिल्लीत भाजप आणि आम आदमी पक्षात (BJP and AAP) ‘काटे की टक्कर’ होतांना दिसत आहेत. तर काँग्रेसचा (Congress) धुव्वा उडण्याची शक्यता आहे.

यात मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीत भाजपला ३५ ते ४० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर आपला ३२ ते ३७ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार, आपला २५ ते २८ जागांवर यश मिळण्याची शक्यता असून काँग्रेसला २ ते ३ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपला या निवडणुकीत ३९ ते ४४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

तसेच डिव्ही रिसर्चच्या पोलनुसार, दिल्लीत भाजपला सर्वाधिक ३६ ते ४४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर आपला २६ ते ३४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पिपल्स इनसाईट्सच्या अंदाजानुसार, आपला २५ ते २९ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला ४० ते ४४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक ४२ ते ५० जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर आपला २६ ते ३४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या