Saturday, November 9, 2024
Homeदेश विदेशदिल्लीत CRPF च्या शाळेजवळ मोठा स्फोट, लोकांमध्ये भीती अन् गोंधळाचे वातावरण

दिल्लीत CRPF च्या शाळेजवळ मोठा स्फोट, लोकांमध्ये भीती अन् गोंधळाचे वातावरण

दिल्ली | Delhi

दिल्लीतील रोहिणी इथे प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सीआरपीएफ शाळेजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून तणावाचं वातावरण आहे.

- Advertisement -

ही घटना आज सकाळी ७.५० च्या सुमारास घडली. स्फोट इतका मोठा होता की परिसरातील काही गाड्यांच्या काचा फुटल्या. ही शाळा CRPF ची असल्यानं या घटनेनंतर यंत्रणा पूर्ण अलर्ट झाल्या असून, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला. एफएसएलची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचली. स्थानिक डीसीपी अमित गोयल यांनी या घटनेची माहिती दिली. हा स्फोट दहशतवादी हल्ला होता की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या