Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात ५ विशेष न्यायालय, शेतीत AI चा वापर, गौण खनिजाच्या अवैध...; राज्य...

राज्यात ५ विशेष न्यायालय, शेतीत AI चा वापर, गौण खनिजाच्या अवैध…; राज्य मंत्रिमंडळात ८ महत्वाचे निर्णय

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अवैध वाळू व गौण खनिज उत्खननाविरोधात कडक कारवाई, न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि मुंबई रेल्वेच्या विकासासाठी मोठ्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी ५ जिल्ह्यात विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.

Supreme Court: मोठी बातमी! जंतरमंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी SIT मार्फत चौकशी होणार; महाराष्ट्रासह ७ राज्यांना नोटीसा

  1. महाॲग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रिटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील “व्यवस्थापकीय संचालक” पदास मान्यता. (कृषी विभाग)
  2. मादक द्रव्ये व मादक पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत दाखल प्रकरणे चालविण्याकरीता पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास मान्यता. (विधि व न्याय)
  3. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता. (विधि व न्याय)
  4. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता. (विधि व न्याय)
  5. अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९, सुधारीत अधिनियम, २०१५ अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड व यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्यास मान्यता. (विधि व न्याय))
  6. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश. (ग्राम विकास व पंचायती राज)
  7. मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयापर्यंत वाढविणार. कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही २५ कोटी वरुन २२५ कोटी रुपये वाढवणार. (नगर विकास विभाग-१)
  8. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८ (७) सुधारणा. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी स्वामित्वधनाच्या दहापट दंड. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधींना देशाशी काहीच देणंघेणं नाही, त्यांचा अजेंडा…;...

0
मुंबई | Mumbai लोकसभेत 'अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयका'वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (बुधवारी) भाषण केले. यावेळी त्यांनी...