Sunday, November 8, 2026
Homeदेश विदेशकेंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय! जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले 'हे'...

केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय! जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ‘हे’ ३ पर्याय

दिल्ली | Delhi

देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात अनेक ऐतिहासिक आंदोलनांचे व्यासपीठ ठरलेले नवी दिल्लीतील ‘जंतर-मंतर’ आता धरणे आंदोलनांसाठी बंद होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि सुरक्षेच्या अत्यंत गंभीर कारणांचा विचार करून दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला किंवा निदर्शनांना मनाई करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील आंदोलनांच्या संस्कृतीला आणि स्वरूपाला एक नवी दिशा मिळणार आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दशकांपासून देशातील कानाकोपऱ्यातून येणारे नागरिक, संघटना आणि राजकीय पक्ष आपल्या मागण्या मांडण्यासाठी जंतर-मंतरची निवड करत असत. मात्र, सुरक्षेचा वाढता ताण आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता प्रशासनाने हा ऐतिहासिक बदल केला आहे.

नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना सनदशीर मार्गाने आंदोलन करता यावे, यासाठी पोलिसांनी तीन नवीन पर्यायी जागा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार आता यापुढे आंदोलकांना रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी (CBD) ग्राउंड या तीन अधिकृत ठिकाणीच धरणे निदर्शने करण्याची परवानगी दिली जाणार आहे. दिल्ली पोलिसांच्या या धोरणात्मक निर्णयाचे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटत आहेत.

ताज्या बातम्या

कळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून...

0
कळवण | प्रतिनिधी Kalwan दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असतानाच कळवण शहराला रविवारी सकाळी मोठा धक्का बसला. शहरातील सबस्टेशन ते कळवण...