Friday, October 11, 2024
Homeदेश विदेशदिल्लीत दहशतवाद्यास अटक, दारुगोळा, AK-47, हँड ग्रेनेड जप्त

दिल्लीत दहशतवाद्यास अटक, दारुगोळा, AK-47, हँड ग्रेनेड जप्त

दिल्लीतून एका पाकिस्तानी (Pakistani)दहशतवाद्याला (terrorism)ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी (police)या दहशतवाद्याकडून (terrorist arrest)AK-47 बंदूक आणि मोठ्याप्रमाणात दारुगोळा व हँड ग्रेनेड जप्त केला आहे. मोहम्मद अशरफ अली असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव सांगितले जात आहे. तो पाकिस्तानातील पंजाबच्या नरोवाल येथील रहिवासी आहे.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

दहशतवाद्याकडून भारतीय पासपोर्ट ()देखील सापडला आहे. पोलिसांना त्याच्याजवळून एक बनावट आयडी देखील सापडला आहे. ज्यामध्ये दिल्लीच्या शास्त्री नगरचा पत्ता लिहिला आहे. या आयडीमध्ये त्याचे नाव अली अहमद लिहिले आहे.

चौकशी सुरु

दिल्ली पोलिसांना अनेक दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की एक पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या