Saturday, June 6, 2026
Homeदेश विदेशAbhijit Dipake: मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके दिल्लीत दाखल

Abhijit Dipake: मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके दिल्लीत दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके हे भारतात दाखल झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला अखेर दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली असून काही वेळा पूर्वी आंदोलनाला सुरवात झाली आहे. या आंदोलनाला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारोंच्या संख्येने तरुण आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे. अमेरिकेहून परतलेल्या दीपके यांनी इमिग्रेशन पूर्ण केल्यानंतर, काही पोलीस अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर त्यांची भेट घेतली. CJP ने आता आंदोलकांना पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशन ऐवजी थेट जंतरमंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, 6 जून (शनिवार) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जंतरमंतरवर हे आंदोलन करता येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी स्वतः ट्विट करून समर्थकांना माहिती दिली. पोलिसांनी परवानगी दिली आहे. समर्थकांनी जंतरमंतरवर एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

अभिजित दिपके यांचे आंदोलकांना आवाहन
शनिवारी सकाळी आंदोलनाबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना, अभिजित दीपके यांनी आंदोलकांना आवाहन केले आहे की “सर्व समर्थकांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात न जाता थेट जंतरमंतरवर पोहोचावे. तेथे सकाळी १० वाजल्यापासून आपले शांततापूर्ण आंदोलन सुरू होईल. सर्व समर्थकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्या लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने मांडाव्यात.” सोबत एक पुस्तक आणि तिरंगा घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. आंदोलक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलकांशी संघर्ष टाळण्यासाठी आणि त्यांना शांतता राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीतील सुमारे २ हजार कर्मचारी तैनात केले आहेत.

सोशल मीडियावर निर्माण झालेल्या या कॉक्रोच जनता पार्टीचे पहिल्यांदाच भव्य जनआंदोलन होत आहे. महत्त्वाची म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा १६ मे रोजी करण्यात आली होती. त्यानंतर महिन्याच्या आतच पहिलं आंदोलन पाहायला मिळत आहे.

संपादकीय : ६ जून २०२६ – जखम डोक्याला अन् पट्टी पायाला!

कॉकरोच जनता पार्टीने देशातील परीक्षांमधील गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, कोचिंग क्लासशी संबंधित नागरिक दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतरमंतर जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेडिंग केले असून, वाहनांची कसून तपासणी केल्यानंतरच पुढे सोडले जात आहे.

ताज्या बातम्या

आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा! अय्यर कर्णधार,...

0
मुंबई । Mumbai भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि जपानमधील आशियाई खेळांसाठी अचानक टी-२० संघाची घोषणा करत क्रिकेट विश्वाला मोठा धक्का...