Thursday, July 23, 2026
Homeमुख्य बातम्याDelhi AC Blast : दिल्लीत अग्नितांडव; एसी नऊ जणांच्या जिवावर बेतला!

Delhi AC Blast : दिल्लीत अग्नितांडव; एसी नऊ जणांच्या जिवावर बेतला!

साखरझोपेत असणारी कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी

नवी दिल्ली | New Delhi

सध्या देशभरात उष्णतेने (Heat) कहर केला आहे. दिवसांदिवस तापमान वाढत असल्याने या उकाड्यापासुन बचाव करण्यासाठी अनेक घरांमध्ये पंखा किंवा एसी (AC) सारख्या उपकरणांचा सर्रास वापर केला जातो. मात्र, याच एसीमुळं एक भीषण घटना (AC Incident) दिल्लीमध्ये घडली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा अतिशय मोठ्या स्फोटामुळे (AC Blast) दिल्लीच्या विवेक विहार (Delhi Vivek Vihar) परिसरात भीषण दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू ओढावला आहे. एसीच्या स्फोटामुळे क्षणातच आग भडकली आणि होत्याचं नव्हतं झालं. अग्निशामक दलाला या दुर्घटनेची माहिती पहाटे साधारण 3 वाजून 47 मिनिटांच्या सुमारस मिळाली, ज्यानंतर तातडीनं घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 14 गाड्या पोहोचल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

- Advertisement -

बचावकार्यासाठी पोहोचलेल्या पथकानं दिलेल्या माहितीनुसार बी 13 या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ही आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण इमारीत पसरली. जवळपास अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्या. साधारण रविवारी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास ही आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत 9 जणांचा मृत्यू (Death) ओढावला होता. तर 6 जण गंभीररित्या होरपळले असल्याची माहिती आहे. जखमींवर नजीकच्याच रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार या अगिनितांडवामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत आहे. जे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत ते अतिशय विदारक स्थितीत असल्यामुळं त्यांची ओळख पटत नाहीये. अग्निशामक दलाच्या जवानांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन मृतदेह तर बेडवरच आढळले. आग इमारतभर पसरल्यानं बचावकार्यात अनेक अडचणी आल्या. प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार एसीमध्ये झालेल्या एका स्फोटामुळं आग भडकली असू शकते.

ताज्या बातम्या

अभिजीत

Abhijeet Dipke On PM Modi: “Hi my name is Nothing”; पंतप्रधानांच्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची...