Thursday, April 16, 2026
Homeनाशिकगोळशी फाटा अपघातप्रवणक्षेत्र घोषित करा

गोळशी फाटा अपघातप्रवणक्षेत्र घोषित करा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

राष्ट्रीय महामार्ग क्र. 848 (National Highway no. 848)या मार्गावरील उमराळे बु. ते गोळशीफाटा ( Umrane To Golshiphata Road )या दरम्यान सातत्याने अपघात ( Accidents )होत असल्याने अपघातप्रवणक्षेत्र घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी जालखेड ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आजी माजी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाना निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील तीन वर्षापूर्वी नाशिक – पेठ – गुजरातला जोडणारा या राष्ट्रीय महामागार्च नूतनीकरण झाले. परंतू रस्ता चांगला झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला. परंतु या रस्त्यावर सातत्याने अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण वाढले. अलीकडील सातत्याने मोटारसायकल, कार, ट्रक यांचे अपघात होत आहे. तीन महिन्यात 20 ते 22 अपघात होऊन यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.

या रस्त्यावर गतिरोधक तटरक्षक, झेब्राक्रोसिन, अरुंद पुलावरती फलक या सारख्या उपायोजना करणे गरजेचे आहे. या परिसरात रुग्णवाहिका, पोलिस पेट्रोलीम, डॉक्टर यांची या महामार्गावर व्यवस्था होणे गरजेचे आहे. तरी याबाबत संबंधित विभागाने रस्त्याची तात्काळ पाहणी करुन पुढील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी जालखेड, उमराळे बु., चाचडगाव, धाऊर, आंबेगण, गोळशी, झार्ली या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

उमराळे बु. ते गोळशीफाटा या दरम्यान सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. या महामार्गावर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे उमराळे बु. ते गोळशीफाटा या दरम्यान गतिरोधक, तटरक्षक, झेब्राक्रोसिन, अरुंद पुलावरती फलक लावण्यात यावे. त्यामुळे अपघताला टाळता येईल.

जीवन मोरे, उपसरपंच जालखेड

ताज्या बातम्या

रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना; टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
ओझे l वार्ताहर Oze नाशिक-अकराळे फाटा रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू असताना आज सायंकाळी ढकांबे टोल नाक्याजवळ दुर्दैवी अपघात घडला. रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत...