Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना; टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना; टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दिंडोरी / ओझे l प्रतिनिधी Dindori / Oze

- Advertisement -

नाशिक-अकराळे फाटा रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू असताना आज सायंकाळी ढकांबे टोल नाक्याजवळ दुर्दैवी अपघात घडला. रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत महिला शेतकरी जागीच ठार झाल्या.

या अपघातात कमल देविदास बोडके (वय 55) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कामाच्या ठिकाणी कोणतीही योग्य सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षितता व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी प्रशासन व ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....