Thursday, May 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - खा. भास्कर भगरे यांची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – खा. भास्कर भगरे यांची मागणी

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह अनेक भागात अती वृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्यावी अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

मतदारसंघात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस होत मोठे नुकसान झाले त्याचा आढावा खासदार भास्कर भगरे यांनी घेत सर्व तहसीलदार यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तसेच निफाड तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शेतीच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.

येवला, चांदवड, निफाड, कळवण, दिंडोरी पेठ, सुरगाणा तचेच मालेगाव तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे कांदा, सोयाबीन, मका, कापुस, भातशेती, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिका सोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने पुढील 3 ते 4 वर्ष त्या शेतात शेतकऱ्यांना पिके घेता येणार नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शासन स्तरावर नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरीत जाहीर करावी अशी मागणी भगरे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना पत्र देत नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली.

शासकीय अटी शर्ती शिथिल करा
मे महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने अगोदरच शेत पिकांचे नुकसान झाले व पुन्हा मंगळवारी पहाटे सर्वत्र जोरदार पाऊस होत राहिलेल्या पिकांचेही नुकसान झाले. शासनाने त्यांना मदत करणेसाठी 65 मिली. मी. पावसाची अट शिथिल करून त्यांना पीक विमा मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्वरित ड्रोनद्वारे सरसकट पंचनामे करण्यात यावेत. त्वरीत आर्थिक मदत तसेच त्यांना धनधान्य घरपोच देण्यात यावे अशी मागणी ही खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राज्याला काळिमा फासणार्‍या बेकायदेशीर लिंगनिदान चाचणी प्रकरणाचा लोणी पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथकाने अत्यंत सखोल तपास सुरू केला...