Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकVideo : महापौर, आयुक्तांच्या खुर्ची जप्तीच्या आदेशानंतर जाग; सातपूरमध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहीम...

Video : महापौर, आयुक्तांच्या खुर्ची जप्तीच्या आदेशानंतर जाग; सातपूरमध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविणार

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरातील झोपडपट्टयांचे अतिक्रमण अद्याप काढण्यात आले नाही.  येथील शिवम थियेटरजवळ झालेल्या अतिक्रमणामुळे थियेटर अनेक वर्षांपासून बंद आहे. यामुळे थियेटर मालकाने न्यायालयात धाव घेत न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, तक्रारदाराच्या बाजूने निकाल लाऊन आज महापौर आणि आयुक्तांच्या याप्रकरणी खुर्ची जप्त करण्यात यावी याबाबत आदेश धाडण्यात आले होते.

- Advertisement -

शहराच्या प्रथम नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापौर आणि महापालिका आयुक्त, उपआयुक्त यांच्या खुर्च्याची जप्ती होणार असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

दरम्यान, न्यायालयाचे पथक महापालिकेत जप्ती साठी दाखल झाल्यानंतर  आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पथकात चर्चा सुरु झाली. तब्बल तीन तास खलबतं सुरु होती. घटनेची पार्श्वभूमी आणि गांभीर्यता लक्षात घेत आयुक्तांनी येणाऱ्या काही दिवसांत अतिक्रमण निर्मुलन मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

आयुक्त गमे यांनी केलेल्या मनधरणीमुळे पथक माघारी गेले असून तूर्तास तरी महापौर आणि आयुक्त, उपायुक्तांची खुर्ची वाचविण्यात महापालिकेला यश आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : नगरसेवकांच्या मतांचे ‘वजन’ वाढले; ‘लक्ष्मी दर्शन’वरच...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघ्या काही तासांवर आले आहे.त्यामुळे...