Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajabhau Waje : "…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी"; संजय राऊतांकडून...

Rajabhau Waje : “…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी”; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) नऊ पैकी सहा खासदारांनी काल (मंगळवारी) रात्री दिल्लीत हजेरी लावली होती. यानंतर त्यांची शिंदे गटाच्या (Shinde Group) खासदारांसोबत एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. यानंतर या सहा खासदारांनी एक वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यास मान्यता द्यावी यासाठी एक पत्र दिले होते. त्यानंतर आज (बुधवारी) सकाळी बिर्ला यांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ठाकरे सेनेकडे लोकसभेचे फक्त तीन खासदार उरले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rajabhau Waje : “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम, पक्ष आणि नेतृत्वांशी फारकत…”; ठाकरे सेनेचे खासदार वाजेंची प्रतिक्रिया

दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या फुटीर गटाला मंजुरी देण्याआधी दिल्लीत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस राऊत यांच्यासह खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. यावेळी भर पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिक लोक्साभेचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले

मात्र याचवेळी खासदार राजभाऊ वाजे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यावेळी राऊत त्यांचे कौतुक करत होते त्यावेळी वाजे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पत्रकार परिषदेत (Press Conference) कॅमेऱ्यासमोरच वाजे यांचा हात दोनदा डोळ्यांवर गेला आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले. यावरून त्यांनी आपल्या नावाभोवती फिरणार्‍या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

खासदार वाजे काय म्हणाले?

या घडामोडींनंतर माध्यमांशी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम आहे. सध्या दिल्लीत असून, उद्या होणार्‍या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. मी ज्या पक्षाच्या तिकीटावर आणि निवडणूक चिन्हावर निवडून आलो आहे, त्या पक्षाशी आणि नेतृत्वांशी कधीही फारकत घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांनी फुटीर खासदारांना सुनावलं

याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांत कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, काही लोकांमध्ये बेईमानी रक्तातच असल्यासारखे वाटते. अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत खासदारांना सर्व काही दिले. रक्त, पैसा दिला, मेहनत घेतली. तरीही त्यांच्याबाबत अशा बातम्या येत असतील तर त्याचे त्यांनी खंडन करावे. जे खासदार आमदार असतील ते पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कुणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना तर कदापि गप्प बसणार नाही, जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी आणि नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही. ज्यांना जायचं त्यांनी राजीनामा देऊन जावे, असेही राऊत म्हणाले.

हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी! ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; शिंदे सेनेत विलीन होणार

फुटीर खासदार कोणते?

संजय जाधव (परभणी) संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम) नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) ओमराजे निंबाळकर (धाराशिव) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....