देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
राहुरी (Rahuri) तालुक्यातील देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील आंबी स्टोअर परिसरातील एका व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) विहिरीत (Well) तरंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुमारे 2 वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देवळाली प्रवरा (Deolali Pravara) परिसरातील आंबी स्टोअर येथील बाळासाहेब कोंडीराम गोलवड (वय 45 वर्ष ) हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते सापडले नव्हते. दरम्यान, रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती सरपण गोळा करण्यासाठी त्या विहिरीजवळ (Well) गेला असता, त्याने आत डोकावून पाहिले असता. त्याला विहिरीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह (Dead Body) दिसून आला. त्यानंतर ही माहिती तात्काळ स्थानिकांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते प्रकाश संसारे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तातडीने माहिती कळविली.
त्यानुसार पो.कॉ. रवींद्र कांबळे व जालिंदर साखरे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता. मृतदेह बाळासाहेब गोलवड यांचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितल्याने मृतदेहाची ओळख पटली आहे. घटनेची माहिती गावात वार्या सारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी नगरसेवक अमोल कदम, सुधीर टिक्कल, शरद संसारे, पिनू झावरे, संतोष झावरे व बबलू घाडगे यांनी मदतकार्य केले.व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुगणवाहिकेतून पाठवला असून राहुरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




