Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार ’देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार’ सोहळा

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार ’देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार’ सोहळा

नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik


आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर विविध क्षेत्रात यशाची शिखरे सर करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी ‘देशदूत’ समूहातर्फे महिलादिनाचे औचित्य साधून ‘देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे.
नाशिक-पुणे रोडवरील नंदिनी पुलाजवळील ‘नासिक्लब’ येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. ‘देशदूत’ समूहाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रेरणादायी व्यक्तींना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

महिलांच्या संघर्षाला नवी ओळख मिळवून देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य हेतू आहे. हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून तो स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा उत्सव ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमासाठी सोनी पैठणी, टकले ज्वेलर्स (कॉलेजरोड) आणि इंडियन ऑईल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

यांची उपस्थिती ठरणार आकर्षण
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपट आणि कलाक्षेत्रातील नामवंत अभिनेत्रींची उपस्थिती. निवेदक व अभिनेत्री दीप्ती भागवत, प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, अश्विनी कासार, रुचिता जाधव, माधुरी पवार, अदिती सारंगधर, सोनाली पाटील, आरती सोळंकी, सुप्रसिद्ध गायिका मुग्धा खराडे हे कलाकार सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

Sunetra Pawar: वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच…; राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी पाहिल्या. मोठ्या पक्षांमध्ये मतभेद झाले, दुफळी माजली, पक्षाचे दोन भागही झाले. शरद पवार...