Thursday, March 13, 2025
Homeनाशिकउद्यापासून ‘देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’

उद्यापासून ‘देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’

गृहस्वप्नपूर्तीची नाशिककरांना मोठी संधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दैनिक ‘देशदूत’ आयोजित व ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ च्या माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवार दि. 31 जानेवारी ते रविवार दि. 2 फ्रेब्रुवारी 2025 पर्यंत नाशिकरोड, जेलरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश असेल. पहिले घर घेऊ इच्छिणार्‍यांसाठी तसेच सध्या घर असलेल्या परंतु, नव्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी या प्रदर्शनात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

शुक्रवारी (दि. 31) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक अध्यक्ष दत्ता गायकवाड, देवळाली छावणी परिषद उपाध्यक्ष प्रीतम आढाव, सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, गोविंद दंडे अँड सन्स प्रा. लि. संचालक योगेश्वर दंडे, ए.सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक ऋषभ जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नाशिकरोड शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एण्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी, निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, टोलेजंग मॉल्स, मुख्य बाजारपेठ, शेतीप्रधान परिसरं आणि माळेगाव, शिंदे, सिन्नर औद्योगिक वसाहतींना कनेक्ट असणारा नाशिक-पुणे महामार्ग यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

याशिवाय वेगवान रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेमुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. आगामी निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क यांसारखे अनेक प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. भविष्याचा विचार करता रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे.

घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे फायनान्शियल पार्टनर म्हणून नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक, तर पर्यावरणीय पार्टनर म्हणून पपयाज नर्सरी यांचे सहकार्य लाभले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या गृहस्वप्नपूर्ती कडे पाऊल टाकावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सहभागी बिल्डर्स
ए.सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषिकेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आदित्य डेव्हलपर्स, शहाणे इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कृपासिंधु ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सुयश कन्स्ट्रवेल, शिल्पा इस्टेट, ऋषी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री बिल्डकॉन अँड असोसिएट, एव्हीआय कन्स्ट्रक्शन, केसर इन्फ्रा स्पेस, अमृत लाईफ स्पेसेस, मित्तल अँड संकलेचा एम एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रकाश लढ्ढा ग्रुप, श्रीकर कन्स्ट्रक्शन, शेठ रियल्टी, विश्वकर्मा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रभावी कन्स्ट्रक्शन.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...