Saturday, May 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअभूतपूर्व प्रतिसादात 'देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ची सांगता

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंचवटी व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित व ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’प्रायोजित, सहप्रयोजक सुमित बिल्डकॉन ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2025’चा शानदार समारोप करण्यात आला.

एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरीरोड येथे पार पडलेल्या प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली.

फायनान्शियल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र, तर पर्यावरणीय पार्टनर पपायज नर्सरी हे होते. बांधकाम व्यावसायिक संस्थांचे सुमारे 30 स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते. सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी याप्रसंगी जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, जाहिरात सहायक महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य (शहर), जाहिरात सहायक महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, आदी उपस्थित होते. एक्स्पोला नावाचे माजी अध्यक्ष प्रवीण चांडक, धनंजय मोहाडकर, राजेश शेळके यांनी भेट दिली. एक्स्पो यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर समीर पाराशरे, भगवंत जाधव, आनंद कदम, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, विनोद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...