Friday, June 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

ओळख पटविण्याचे काम सुरु

- Advertisement -

पुनदखोरे | वार्ताहर

कळवण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून कळवण पोलीस ठाणे हद्दीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, ओतूर रोड लगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळविण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे दरम्यान असून तो रस्त्याच्या कडेला मयत अवस्थेत पडलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाचा धागा म्हणून त्याच्या अंगावरील एक विशेष खूण जाहीर केली आहे. सदर इसमाच्या डाव्या हाताच्या कांबीवर माँ गोपाल असे नाव गोंदलेले आहे. याच आधारावर त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ताज्या बातम्या

MLC Election : प्राजक्त तनपुरे बिनविरोध

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उमेदवारी अर्ज माघारीवरून घेण्यात आलेला आक्षेप गैरसमजूतीतून घेण्यात आल्याबाबतचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे...