Wednesday, September 23, 2026
Homeराजकीयछात्रों की गूंज नाही तर झूट की गूंज; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर...

छात्रों की गूंज नाही तर झूट की गूंज; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पुणे । Pune

पुण्यात पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेत, “हा कार्यक्रम ‘छात्रों की गूंज’ नसून ‘झूट की गूंज’ आहे,” अशा शेलक्या शब्दांत फडणवीसांनी राहुल गांधींवर ताशेरे ओढले.

- Advertisement -

पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशात महिलांची स्थिती गंभीर असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी देशभरातील तरुणींशी संवाद साधताना त्यांना कुटुंबाविरोधात बंड करण्यास प्रवृत्त करत आहेत. भारत देश पितृसत्ताक आहे आणि इथे महिलांना स्थान नाही, असा खोटा प्रचार करून ते तरुणाईची दिशाभूल करत आहेत. आज अनेक जण तरुणांना जेन झी (Gen Z) किंवा अल्फा जनरेशन म्हणतात, पण मी या तरुणांना देशाची खरी युवाशक्ती मानतो आणि ही युवाशक्ती अत्यंत हुशार व जागृत आहे.”

राहुल गांधींच्या वक्तव्यांचा पोलखोल करताना फडणवीसांनी कर्नाटकातील एका घटनेचा विशेष उल्लेख केला. “कर्नाटकात राहुल गांधींच्या भाषणानंतर एका तरुण मुलीने त्यांच्या ४० मुद्द्यांचे फॅक्ट चेक केले. त्यातील तब्बल २९ मुद्दे साफ खोटे असल्याचे तिने सिद्ध केले आणि ‘झूट की गूंज’ नावाची वेबसाईट सुरू करून त्यांचे पितळ उघडे पाडले. मात्र, काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने सत्य स्वीकारण्याऐवजी त्या मुलीवरच गुन्हा दाखल केला,” असा थेट आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवताना मुख्यमंत्री म्हणाले, “या देशात मातृसत्तेचे सर्वात मोठे आणि पवित्र प्रतीक म्हणजे ‘वंदे मातरम्’ आहे. ज्या गीतासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिक फासावर चढले, त्या गीतावर काँग्रेसचा नेहमीच आक्षेप राहिला आहे.” महिलांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरताना ते शेवटी म्हणाले, “राहुल गांधी महिला सबलीकरणाच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्ष संधी देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी प्रियंका गांधी यांना का पुढे केले नाही? हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला स्थान देण्यासाठी एकही महिला नेता मिळत नाही, यावरूनच काँग्रेसचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो.”

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...