Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदेवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवास १५ डिसेंबर पासून प्रारंभ होणार

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवास १५ डिसेंबर पासून प्रारंभ होणार

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सटाणा | प्रतिनिधी Satana

- Advertisement -

शहरात येत्या १५ डिसेंबरपासून देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने यात्रा समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील मंदिरात पहाटे महापूजा, दुपारी रथ मिरवणूक तसेच विविध कार्यक्रम संपन्न होणार असून दरवर्षीप्रमाणे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी पहाटे चार वाजता बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे व प्रतिभा चावडे, मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व स्वप्निल पाटील तसेच देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड आदींच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता पोलीस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस निरीक्षक योगेश पाटील आदींसह पोलीस विभागाचे अधिकारी, सेवक तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

पंधरा दिवसांच्या कालावधीत यात्रोत्सव काळात अन्नदान, कुस्ती दंगल, दहीकाला व कीर्तन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार असून, नुकतेच झालेल्या यशवंत लीलामृत परायण सोहळा भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यात्रोत्सवात पाळणे, हॉटेल्स इतर विविध दुकाने थाटण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला...