Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashikroad News : वालदेवी नदीतीरावर छटपूजेचा भक्तिमय सोहळा; उत्तर भारतीय बांधवांचा उत्स्फूर्त...

Nashikroad News : वालदेवी नदीतीरावर छटपूजेचा भक्तिमय सोहळा; उत्तर भारतीय बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

वडनेर दुमाला येथील ब्रह्मगिरी घाट, वालदेवी नदीतीरावर छटपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या १३ वर्षांपासून गटनेते तथा नगरसेवक केशव तात्या पोरजे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी छटपूजेचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक परंपरा जपली.

- Advertisement -

वडनेर दुमाला तसेच वडनेर गेट येथील लष्करी भागातील उत्तर भारतीय नागरिक या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने छठी मातेची पूजा करून मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह आरोग्य आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी भाविकांनी श्रद्धेने हे व्रत केले. पारंपरिक पूजाविधी, धार्मिक गीते आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वालदेवी नदीतीरावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने या उत्सवाचे आयोजन होत असल्याने परिसरातील उत्तर भारतीय बांधवांसाठी हा सोहळा श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा महत्त्वपूर्ण उत्सव ठरला आहे. या माध्यमातून विविध समाजघटकांमध्ये धार्मिक आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होत आहे.

या कार्यक्रमास नगरसेवक योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे, नगरसेविका वैशाली दाणी, संजय हांडोर, राजेंद्र यादव, भरत सिंग, सुभेदार पाठक, डी. सी. रॉय, दत्तू पाळदे, अरुण गडकर, संजय गायकर, उमेश पोरजे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

छट महापर्वानिमित्त गोदाघाटावर लाखो भाविकांचा जनसागर; रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप

0
पंचवटी । प्रतिनिधी Panchavati सूर्योपासना, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असलेल्या छट महापर्वानिमित्त रविवारी (दि. १५) गोदाघाटावर उत्तर भारतीय बांधवांचा अभूतपूर्व जनसागर लोटला. लाखावर भाविकांच्या...