Sunday, November 15, 2026
HomeनाशिकNashik News : सप्तशृंगी गडावरील वाहनचालकांना पोलिसांचा 'अल्टिमेटम'; भाविकांची लूट, गैरवर्तन केल्यास...

Nashik News : सप्तशृंगी गडावरील वाहनचालकांना पोलिसांचा ‘अल्टिमेटम’; भाविकांची लूट, गैरवर्तन केल्यास होणार कठोर कारवाई

सप्तशृंगी गड | प्रतिनिधी | Saptashrungi Gad

महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सन्मानाला प्राधान्य देत कळवण पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना कडक इशारा दिला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी गडावर ये-जा करणाऱ्या सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे (Trafic Rules) आणि शिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

वाहनचालकांसाठी पोलीस प्रशासनाचे कडक निर्देश

भाविकांकडून ठरवून दिलेल्या निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे वसूल करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे किंवा वाहन चालवताना निष्काळजीपणा दाखवणे यांसारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. भाविकांशी (Devotees) उद्धटपणे किंवा अरेरावीची भाषा वापरणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

भाविकांची सुरक्षितता आणि सुविधेला प्राधान्य

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर येतात. अशा वेळी वाहनचालकांनी भाविकांशी नम्रतेने वागणे, योग्य भाडे आकारणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. भाविकांची आर्थिक लूट किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांना प्रशासनाकडून कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

भाविकांना पोलिसांचे आवाहन

सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून वाहनचालकाने जादा भाडे आकारल्यास किंवा गैरवर्तन केल्यास, त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. भाविकांची सुरक्षितता, सन्मान आणि सुरळीत वाहतूक राखणे हेच पोलीस प्रशासनाचे मुख्य प्राधान्य असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : कादवा नदीपात्रात रसायनमिश्रित सांडपाण्याचा विसर्ग; शेकडो जलचर...

0
म्हेळुस्के | वार्ताहर | Mheluske दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर औद्योगिक परिसरातील एका कंपनीच्या आऊटलेटमधून अत्यंत विषारी आणि केमिकल मिश्रित दूषित पाणी थेट पवित्र कादवा...