Tuesday, December 3, 2024
Homeशब्दगंधसुंबरान मांडलं

सुंबरान मांडलं

– वैजयंती सिन्नरकर

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

- Advertisement -

ज्योतिबांच्या नावानं चांगभलं

सुंबरान मांडलं ग सुंबरान मांडलं

हे गीत कानावर पडताच श्रद्धाने बाबांना विचारले बाबा, म्हणजे काय? तेव्हा संजय सांगू लागला ‘सुंबरान’ म्हणचे स्मरण. हा धनगर समाजाचा मोठा उत्सव. कुलदेवतेच्या आराधनेसाठी साजरा होणारा हा प्रमुख खेळ. शेळ्या, मेंढ्या पाळणारे वृंदावन, मथुरे होऊन गुजरात आणि महाराष्ट्रात आलेले जवळपास 14 उपघटक असलेले हे धनगर. त्यांच्या ओव्यांना धनगरी ओव्या म्हणतात. धनगरी ओव्या म्हणजे गुणगुणायला लावणार्‍या तर तसेच नृत्याचे वैशिष्ट्य असते. नृत्य म्हणजे कोणालाही ठेका धरायला लावणारे. असेच हे धनगर आठ महिने भटकत असतात. पण पावसाळ्याचे चार महिने ते एकाच ठिकाणी असतात, जेव्हा त्यांची भटकंती होत असते तेव्हा त्यांचे मार्गदेखील ठरलेले असतात. कोणीही आपला मार्ग सोडत नाही. शिवाय भटकंती करताना आपला संसार ते घोड्यावरून वाहून नेतात. परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर जरी हा समाज असला तरी त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कुलदेवतेची आराधना करताना ओव्या. मौखिक रूपात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे शिकवल्या गेल्या. चिन्मयने बाबांना विचारले, मौखिक म्हणजे काय? मौखिक म्हणजे तोंडाने सांगितलेले. म्हणूनच या ओव्यांचे स्वरूप मौखिक वाङ्मय या प्रकारात मोडते. या ओव्यांचे कोणतेही छापील लेखन, साहित्य आजही उपलब्ध नाही. तोंडी पाठांतराद्वारे हा सांस्कृतिक ठेवा हजारो वर्षे धनगरांनी जतन केला असून तो निश्चितच कौतुकास्पद आहे.

पशुपालन, मेंढपाळ असणारा सर्वात मोठा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जाते. एवढेच नाही तर या समाजातील काही वर्ग शेती करतानाही दिसून येतो. घोंगड्या विणणारे सनगर तर मेंढ्या पडणार्‍यांना हटकर म्हणतात. पावसाळ्यात आपापल्या गावी असणारे हे लोक, दिवाळीनंतर चार्‍यासाठी भटकंती करत असतात. पावसाळ्यात गावात असताना एकत्रितपणे कुलदेवतेच्या आराधनेसाठी खेळ हा मोठा उत्सव साजरा करतात. देव-देवतांची आराधना, स्मरण करण्यासाठी ओव्या मराठीत म्हटल्या जातात. ओवीच्या सुरुवातीला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना नमन करून कुलदेवतांचे स्मरण केले जाते. ढोल व झांजाच्या तालावर ठेक्यात व ठसक्यात या ओव्या गायल्या जातात. बर्‍याच वेळा बासुरी (पावा) वाजवून ओव्या गायल्या जातात. धनगरी ओवीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दोन भागात विभागलेल्या असतात. 1) भाग पहिला अर्थात गाणे (पद्यरूपात सादर केल्या जातात) हा भाग गाऊन दाखवणे हा महत्त्वाचा भाग. 2) भाग दुसरा म्हणजे कथा (गद्यरूपात सादर केला जातो) हा भाग गोष्टीरूपाने सांगितला जातो. ओव्यांबाबत अधिक विचार केला असता लक्षात येते, गाणारे वेगळे असतात तर कथा सांगणारे वेगळे असतात.

गण्यातली माहितीच कथेतून सांगितली जाते. कथेच्या या भागाला सपादनी म्हणतात. तर ओवीची प्रत्येक ओळ गाताना दोन किंवा चारवेळा सलग म्हंटली जाते. त्याचप्रमाणे तीच ओळ दुसरा, तिसरा, चौथा आळीपाळीने म्हणतात. कथा सांगणारेदेखील अशाच पद्धतीने करतात. धनगरांचे मौखिक वाङ्मय ओव्यांचे तीन देवता बिरोबा, धुळोबा आणि शिंग्रोबा.

अहो गण गायला कुणी गणाचा

कोणी गायला शिवशंभूचा

गण गातो मी भगवानाचा

देवाचा रूप माझ्या देदीप्यमान

काड्या कांबळ्याचं रोवल निशाण

भंडाराच्या जीवावर त्यान जिंकला अवघा त्रिभुवन

शाहिरी कलाई देवाचं देणं

वागू नका गर्वाने

गोडी गुलाबीन राहूया आम्ही वागूया सगळे प्रेमाने

असे ज्यांच्याबाबत म्हटले जाते ते बिरोबा हे धनगरांचे मुख्य दैवत आहे. बिरोबा त्यांची आई मसुरावंती या ओव्यांमध्ये बिरोबांच्या आईची माहिती तपशीलवार सांगितली जाते. तसेच बिरोबांची जन्मकथासुद्धा सांगितली जाते. यानंतर बिरोबांच्या मानलेल्या बहिणीची म्हणजे पायक्कोची आणि बिरोबांच्या पत्नीची म्हणजे कामाबाईंची माहिती गाण्यात व कथेतून सांगितली जाते.

दुसरे दैवत धुळोबा

लई ग भारी, जत्रा न्यारी

भरती लाखान, भरती लाखान

फलटणच्या त्या धुळोबाच पाहू

लई ग भारी ठिकाण

लई ग भारी ,जत्रा न्यारी

कांबळी शेरच्या, भिऊबाईच

पाहू ठिकाण

धुळूदेवाच चरण धरूबा

आम्ही गीत तालासुरात करूबा

असे गात गात धुळोबा या दुसर्‍या दैवताचे वर्णन ते करतात. धुळोबा आणि बिरोबा या दोघांमधले वैशिष्ट्य म्हणजे जन्म, बालपण, तारुण्य, विवाह, गृहस्थी जीवन आणि दुष्टांचा नाश अशा पद्धतीने एकसमानता ह्या दोघांमध्ये आहे. परंतु काही भिन्नतादेखील आढळतात. बिरोबांच्या ओव्यांत देव भक्ताला भेटायला येतो. धुळोबांच्या ओव्यात धुळोबा आणि भिवाई नदी- देवता, बहीण-भावांच्या नात्यावर जास्त जोर दिलेला आढळतो.

तिसरे दैवत शिंग्रुबा

इठ्ठल – बिरू देवाचं चांगभलं

खेलु – महादेवाचे चांगभलं

सुंबरान मांडील गं सुंबरान मांडील गं

सुंबरान मांडील गं सुंबरान मांडील गं

असे म शिंग्रुबा

शिंग्रुबाची कथा वेगळी आहे. मुंबई – पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा रस्ता कसा व कुठे तयार करायचा, रेल्वे रूळ कुठल्या भागात टाकायचे, ब्रिटिश इंजिनिअर यांना समजावून सांगणारा हा धनगर म्हणजे शिंग्रुबा. धनगराची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारत मानव जातीच्या कल्याणासाठी असे अफाट कार्य केले. त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यातून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेंढरं चरायला नेत असत. त्यामुळे येथील जमिनीची, कड्या-कपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची, दगडी टणकपणाची खडान्खडा माहिती त्याला होती. त्या माहितीच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला. बोगदे निर्माण केले गेले व मुंबई – पुणे जोडले गेले म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते.

‘सुंबरान मांडीला ग सुंबरान मांडीला’चा घोष. धनगरी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असणारे हे गजनृत्य. माणदेशात छोट्या छोट्या बनगरवाड्या बहुसंख्येने आहेत. त्यामुळे धनगर समाज इथे एकवटलेला आहे. त्यामुळे माणदेशी महोत्सवाला धनगरीबाज नसता तरच नवल! गजनृत्य म्हणजे काय आहे? तर मेंढपाळ असणारा धनगरी समाज हा नृत्य प्रकार सादर करतो. धनगर मेंढी, बकर्‍या यांचे कळप पाळतात आणि तेच त्यांच्या जीवनाचे उदरनिर्वाहाचे साधन असते. आज असे हे सुंबरान गाणारे धनगर आणि त्यांची कथा तुम्हाला लोककलेच्या माध्यमातून कळाली आहे. आता पुढे अजून पुढची लोककला कोणती ते

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या